अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, भाजपने माफी मागावी – आदित्य ठाकरे
आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या तर स्वार्गात जागा मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केले होते. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपने माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
VIDEO | “The BJP hates the Constitution of India. The BJP dislikes the ethos of India. The BJP does not accept Dr Babasaheb Ambedkar… this is why they are speaking like this,” says Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray (@AUThackeray).
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/xL2MuPCvEw
— Press Trust of India (@PTI_News) December 18, 2024
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनीच आपल्याला आणि देशाला संविधान दिलेले आहे. ते आपल्या देशातल्या कोट्यवधी जनतेसाठी देवासारखेच आहेत. त्यांचा अपमान हा देश सहन करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपने यावर स्पष्टीकरण द्यावं आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. ते हा देश सहन करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, देशातील कोट्यवधी जनतेसाठी ते देवच आहेत. आणि त्यांचा कोणी अपमान करत असेल तर हा देश सहन करणार नाही. भाजपच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्द जो द्वेष आहे, संविधानाबद्दल जो द्वेष आहे ते आज दिसून येत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List