मुकेश खन्नाच्या ‘त्या’ वक्तव्यावर सोनाक्षी संतापली, पोस्ट शेअर करत दिले सेडेतोड उत्तर
शक्तीमान फेम मुकेश खन्ना कायम त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या वादग्रस्त विधानासाठी ट्रोल होतात. नुकतेच त्यांनी सोनाक्षी सिन्हा केबीसीमध्ये हनुमानाच्या प्रश्नाला उत्तर देऊ न शकल्याने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मुकेश खन्ना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या पालनपोषणावर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, ज्यावेळी सोनाक्षीला याबाबत कळले त्यावेळी ती मुकेश खन्ना यांच्यावर संतापली. तिने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना याच्यावर संताप व्यक्त केला. सध्या ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे.
सोनाक्षीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मुकेश खन्ना यांना उत्तर दिले आहे. त्यांनी लिहीले की, मी हल्लीच तुमचे एक स्टेटमेंट वाचले. त्यात तुम्ही म्हणालात की, ती रामायणासंदर्भात बरोबर उत्तर देऊ शकली नाही ही माझ्या वडिलांची चूक आहे. मी या शोमध्ये फार वर्षांपूर्वी गेले होते. मी तुम्हाला आठवण करून देते की, त्यावेळी माझ्यासोबत आणखी दोन महिला होत्या. मात्र, तुम्ही तर वारंवार माझेच नाव घेत आहात.
शो वर चूक मान्य करत सोनाक्षी म्हणाली की, हो त्यादिवशी मी पूर्णपणे ब्लॅंक होती. विसरणे ही लोकांची मानसिकता आहे. संजीवटी बुटी कोण घेऊन आले होते. मात्र, तुम्ही भगवान राम यांची क्षमा करण्याची शिकवण विसरलात. जर प्रभू श्रीराम मंथराला क्षमा करू शकतात, ते कैकयीला क्षमा करू शकता. जर ते रावणालाही युद्धानंतर माफ करू शकतात तर तुम्ही नक्कीच या छोट्या गोष्टींना सोडून देऊ शकतात. मला तुमच्या माफीची गरज नाही.
पुढे तिने लिहीले की, मला वाटतं तुम्ही विसरुन जा आणि एकच मुद्दा मांडण बंद करा, कारण मी आणि माझे कुटुंब सतत बातम्यांमध्ये येऊ नये आणि अखेरचे …पुढच्यावेळी माझ्या वडिलांच्या संस्कारांबाबत काही बोलायचे असेल ..त्यावेळी कृपया ध्यानात ठेवा. हे तेच संस्कार आहेत ज्यामुळे मी तुमच्याशी सन्मानपूर्वक बोलत आहे. जरी तुम्ही माझ्या पालनपोषणावर वक्तव्य केले होते. सोनाक्षी सिन्हा, मी तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद आणि शुभेच्छा, असे तिच्या स्टोरीत तिने लिहीले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List