‘बाळासाठी प्रार्थना..’; कतरिनाने सासूसोबत शिर्डी साईबाबांचं दर्शन घेताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अभिनेत्री कतरिना कैफ सोमवारी तिच्या सासूसोबत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचली. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात कतरिना आणि विकी कौशलची आई वीणा कौशल नतमस्तक झाल्याचं पहायला मिळालं.
यावेळी कतरिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. शिर्डी साईबाबांसमोर कतरिनाने हात जोडले आणि मनोभावे प्रार्थना केली. यावेळचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे फोटो व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 'कतरिना कदाचित बाळासाठी प्रार्थना करत असेल', असं एकाने लिहिलं. तर 'आई होण्यासाठी कतरिना विशेष प्रार्थना करत असेल', असं दुसऱ्याने म्हटलंय.
शिर्डीत साई बाबांच्या दर्शनानंतर कतरिना आणि तिची सासू जेव्हा मुंबईत परतल्या, तेव्हा एअरपोर्टवरील एका व्हिडीओनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या व्हिडीओमध्ये कतरिना तिच्या सासूला मिठी मारताना आणि त्यांच्या कपाळावर किस करताना दिसली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List