आलिया भट्टला सर्वांसमोर सासूबाईंनी दिली अशी वागणूक, व्हिडीओ पाहून चाहते हैराण
Nitu Kapoor Ignored Alia Bhatt: ‘घरोघरी मातीच्या चुली…’ ही म्हण अगदी खरी आहे. ही म्हण विशेषतः सासू – सून यांना उद्देशून म्हटली जाते. सासू – सून बॉलिवूडच्या असो किंवा सामान्य घरातल्या दोघांमध्ये वाद असल्याचं कधी न कधी दिसून येतंच… आता देखील असंच काही झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि सासू नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ राज कपूर यांच्या 100 व्या जन्मशताब्दी सोहळ्यातील आहे.
व्हिडीमध्ये नीतू कपूर यांनी सर्वांसमोर आलिया भट्ट हिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दोघींमध्ये काही वाद आहेत का? अशा चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
रणबीरने आलिया पाठवलं स्वतःच्या आईकडे…
व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, कार्यक्रमात नीतू कपूर यांची एन्ट्री होते आणि रणबीरचं लक्ष आईकडे जातं. तेव्हा रणबीर पत्नी आलिया हिला आईचं स्वागत करण्यासाठी पाठवतो. पण नीतू कपूर पूर्णपणे आलियाकडे दुर्लक्ष करतात. आलिया जाते पण नीतू कपूर सूनेकडे पाहत देखील नाहीत.
आलिया सासूबाईंचा हात पकडण्याचा प्रयत्न करते. पण नीतू कपूर सरळ पुढे निघून जातात… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे आलिया आणि नीतू कपूर यांच्यामध्ये वाद आहेत… असं देखील चाहते म्हणत आहेत….
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘क्या यार… क्या था ये…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नीतू कपूर का आलिया इग्नोर करत आहेत…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रत्येक सासू – सूनेची अडचण, बॉलिवूड असो किंवा सामान्य…’ अनेकांनी व्हिडीओ पाहून संताप देखील व्यक्त केला आहे.
आलिया आणि रणबीर यांचं लग्न
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीर यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर आलियाने लेक राहा कपूर हिला जन्म दिला. राहाचे देखील सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List