बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, केंद्र सरकार गप्प का?; उद्धव ठाकरेंचा सवाल
बांग्लादेशमध्ये सध्या परिस्थिती चिघळली आहे. बांग्लादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदुंसह इतर समुदायांवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला सवाल केलेत. बांगलादेशात हल्ला होत आहे. इस्कॉन मंदिर जाळलं. तरी गप्प आहोत. इस्कॉनच्या प्रमुखाला अटक होते तरी गप्प, रोज हिंदूंवर अत्याचार होत आहे. आपण गप्प का. आपले विश्व गुरू अत्याचार का पाहत आहे. मोदींना विनंती आहे. युक्रेनचं युद्ध एका फोनवर थांबवलं तसं हिंदूंवर अत्याचार होत आहे तर बांगलादेशबाबत भूमिका घेतली पाहिजे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंचं बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर भाष्य
सत्ताधारी आणि विरोधक देशाच्या दृष्टीने विषय मांडत आहेत. सत्ताधारी उत्तर देत आहे. असं म्हणतात. पण दुर्देवाने असं होत नाही. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन चर्चा नको त्या दिशेने भरकटवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हल्ले होत आहे. दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा संघ आला होता. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्या संघासोबत खेळणं कितपतयोग्य आहे असं आदित्य म्हणाला होता. पण त्यावर उत्तर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे. इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे. हिंदू म्हणजे नुसती मतं नाही. त्यांना भावना आहे. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्यांचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी होता का?यांचं हिंदुत्व मतांपुरतं आहे. हिंदुंची मते हवी. त्यांना भयभीत करायचं. घाबरवायचं आणि सत्तेत आल्यावर स्वत मंदिरं पाडायचं. मंदिरं कुठे सेफ आहेत. बांगलादेशात नाही आणि मुंबईतही नाही. एक है तो सेफ है म्हणता मग मंदिर कुठे सेफ आहे. महाराष्ट्र बेकारीत एक नंबरवर आहे. त्यात हिंदू आहे की नाही. आपल्या मुंबईतील मंदिर पाडण्याचा फतवा रेल्वे काढत आहे. तेव्हा फडणवीस आणि भाजपचं हिंदुत्व काय करत आहे. सिडकोचा मंदिराच्या भुखंडावर डोळा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List