63 वर्षांच्या आठवणी जाग्या झाल्या, सरस्वती मंदिर शाळेच्या अमृतमहोत्सवाआधी भरला वर्ग

63 वर्षांच्या आठवणी जाग्या झाल्या, सरस्वती मंदिर शाळेच्या अमृतमहोत्सवाआधी भरला वर्ग

माहीम येथील सरस्वती मंदिर ही शाळा लवकरच अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या अमृत महोत्सवाआधी शाळेत अनोखा वर्ग भरला. यात 1961 ते 2024 च्या बॅचमधील दोन हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आठवणींना उजाळा दिला.

संपूर्ण शाळा, लायब्ररी, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व कॅण्टीन माजी विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले होते. सेल्फी पॉइंटवरसुद्धा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, गायन सादर केले.

सकाळी 8.30 वाजल्यापासून माजी विद्यार्थी शाळेत जमले, सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत व प्रार्थनेनंतर प्रत्येक बॅच नेमून दिलेल्या वर्गात जाऊन बसले. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जुन्या काळातील काही शिक्षकसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर कोटणीस यांनी शाळेच्या 74 वर्षांतील वाटचालीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच 25 जानेवारी  रोजी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘स्मृतिगंध’ या कार्यक्रमाची माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का ? राष्ट्रवादी अजित पवार गटातील आतली बातमी समोर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का ? राष्ट्रवादी अजित पवार गटातील आतली बातमी समोर
काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली,...
आतापासूनच फिल्मस्टारसारखं वागतेय राहा; एअरपोर्टवर लेकीच्या कृतीने आलियालाही हसू आवरेना, पापाराझींनीही दिलं भरभरून प्रेम
पापाराझींनी चुकीचे नाव घेताच अभिनेत्रीचा संताप म्हणाली… तर, काहींनी चक्क ‘डोसा’ म्हणून चिडवलं
अभिनेत्री प्रियंका चोप्रा झळकणार एसएस राजामौलींच्या चित्रपटात, ‘या’ वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट
जालन्यातील आन्वा पाडा येथे वास्तव्या असलेल्या तीन बांगलादेशीना एटीएस पकडले
डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाबाबत राजकारण करणं दुर्दैवी; अशोक गेहलोत केंद्र सरकारवर संतापले
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमधील मूक मोर्चातून आक्रोश; धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, आंदोलकांची मागणी