Kurla Bus Accident – सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी घेतलं ताब्यात, अपघात नेमका कसा घडला? तपासातून होणार खुलासा
कुर्ला बस अपघात प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून डीव्हीआर जप्त केले आहे. फुटेजमुळे अपघातादरम्यान बसमधील प्रवाशांची ओळख पटवण्यासही मदत होईल आणि साक्षीदार म्हणून त्यांचे जबाब नोंदवता येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवासी या अपघाताचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने घटना घडेपर्यंत चालकाच्या प्रत्येक कृतीचे महत्वपूर्ण पुरावे देऊ शकतात. सीसीटीव्ही फुटेजमुळे बसमधील परिस्थिती आणि चालकाच्या चुका कळण्यास मदत होईल, असेही अधिकाऱ्याने पुढे नमूद केले.
कुर्ला येथे सोमवारी रात्री अपघाताची ही भीषण घटना घडली. बस क्रमांक 332 चा रात्री 9.30 च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. यात 49 नागरिक गंभीर जखमी झाले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाच्या मुख्य व्यवस्थापकांच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List