Team India च्या जर्सीवर झळकण्यासाठी DREAM 11 ने मोजले ‘इतके’ कोटी, जाणून थक्क व्हालं
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून BCCI चा जगभरात डंका आहे. BCCI ची एकून संपत्ती जवळपास 18 हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. IPL, मीडिया हक्क आणि टायटल स्पॉन्सरशिप हे BCCI च्या उत्पन्नाने काही मुख्य स्त्रोत आहेत. IPL आणि मीडिया हक्का संदर्भात तुम्ही बऱ्याच वेळा वाचलं किंवा ऐकल असेल. परंतु टायटल स्पॉन्सरशिप बद्दल तुम्हाला माहित आहे का? टीम इंडियाच्या जर्सीवर ठळक अक्षरात लिहिलेले ‘DREAM 11’ हे नाव लिहण्यासाठी कंपनीने BCCI ला किती पैसे मोजले आहेत? जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.
हिंदुस्थानी संघाच्या पुरुष, महिला आणि अंडर-19 संघाच्या जर्सीवर DREAM 11 ठळक अक्षरात लिहण्यात आले आहे. DREAM 11 ने टीम इंडियाचे मुख्य स्पॉन्सरशिप हक्क 358 कोटी रुपयांना खेरदी केले आहेत. BCCI सोबत DREAM 11 चा करार जुलै 2023 ते मार्च 2026 पर्यंत असणार आहे. तसेच द्विपक्षीय मालिकेसाठी टायटल स्पॉन्सरशीपची मुळ किंमंत 3 कोटी रुपये प्रती सामना इतकी ठेवण्यात आली होती. यापूर्वी टीम इंडियाच्या जर्सीवर Byju’s या शैक्षणिक क्षेत्रातील कंपनीचे नाव होते. ही कंपनी BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी 5.5 कोटी रुपये इतकी रक्कम देत होती.
टायटल स्पॉन्सरशिप व्यतिरिक्त मीडिया हक्कही हजारो कोटींना विकले जातात. हिंदुस्थानात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे मीडिया हक्क विकत घेण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. टीम इंडियाचे सध्याचे सर्व मीडिया हक्क Viacom Network कडे आहेत. या कंपनीने टीम इंडियाचे सर्व सामने प्रसारित करण्यासाठी 5 हजार 963 कोटी रुपये मोजले आहेत. BCCI सोबतचा हा करार सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 या कालावधीपर्यंत असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List