Bus Accident: पुणे ते कुर्ला बस अपघातात महामंडळाचे चुकते कुठे? संतोष मानेनंतर संजय मोरेची पुनरावृत्ती कशी झाली?

Bus Accident: पुणे ते कुर्ला बस अपघातात महामंडळाचे चुकते कुठे? संतोष मानेनंतर संजय मोरेची पुनरावृत्ती कशी झाली?

Mumbai Best Bus Accident: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमएल आणि बृहन्मुंबई विद्युतपुरवठा अन् परिवहन उपक्रम म्हणजे बेस्ट या दोन परिवहन महामंडळांनी पुणे, मुंबईतील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ही दोन्ही महामंडळे पुणे, मुंबईतील लाखो प्रवाशांना रोज सेवा देत असतात. परंतु महामंडळाचे ह्रदय समजल्या जाणाऱ्या चालकांची नेमणूक अन् नियमित तपासणीत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहेत. यामुळे 9 डिसेंबर रोजी झालेल्या कुर्ला बस अपघातात रस्त्यावर चालणाऱ्या सात निष्पांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुणे येथील 2012 मधील संतोष माने प्रकरणाच्या आठवणी राज्यभरातील नागरिकांच्या ताज्या झाल्या आहेत. 25 जानेवारी 2012 रोजी पुणे शहरात घडलेल्या या घटनेत 9 जणांचा मृत्यू तर 37 जण जखमी झाले होते. आता जवळपास 12 वर्षांनी 9 डिसेंबर 2024 कुर्लात घडलेल्या घटनेत सात जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या बारा वर्षांत अनेक वेळा संतोष माने सारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. परंतु त्यापासून धडा परिवहन महामंडळाने घेतला नाही. अन्यथा कुर्लासारखी घटना घडली घडली नसती. आता चौकशी होणार?, समिती गठीत होणार?, मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार? परंतु गेलेले जीव परत मिळणार नाही अन् काही दिवसानंतर या प्रकरणावर पडदा पडले. भविष्यात असे प्रकार घडू नये? म्हणून ठोस उपाययोजना कधी होणार आहे की नाही? हा प्रश्न आहे.

कुर्लामध्ये नेमके काय घडले?

9 डिसेंबर 2024 रोजी बेस्टची बस 332 कुर्ला ते अंधेरी जात होती. बसमध्ये 60 प्रवाशी होते. या बसमध्ये नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. अचानक बस चालक संजय मोरे (54) याचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे या बसने रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना आणि अनेक वाहनांना घडक दिली. त्यानंतर थेट बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफचे जवानही जखमी झाले. अपघातात कानीस अन्नारी (55), विजय विष्णू गायकवाड (70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा (19), अनम शेख (20), फारुख चौधरी (54), शिवम कश्यप (18) यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

संजय मोरे कंत्राटी बसचालक

बेस्टची ही बस 12 मीटर लांब इलेक्ट्रीक बस होती. बेस्टने ही बस भाड्याने घेतली होती. मग अगदी दहा दिवसांपूर्वी रुजू झालेल्या चालक संजय मोरे याच्या हातात दिली. 1 डिसेंबर संजय मोरे याची नियुक्ती झाली अन् त्याच्या हातात तीन महिन्यांपूर्वी आलेली नवीन इलेक्ट्रिक बस दिली. ही बस चालवण्याचा त्याला काहीच अनुभव नव्हता. त्याने फक्त 10 दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी तो खाजगी बस चालवत होता. तो लॉकडाऊननंतर बेस्टमध्ये कंत्राटी बसचालक म्हणून रुजू झाला होता. अनुभव नसताना त्याच्या हाती आता थेट इलेक्ट्रीक बस देणारे अधिकारी कोण? हा सर्वात महत्वाचा प्रश्न या अपघातामुळे समोर आला आहे. दुसरीकडे संजय मोरे याची वैद्यकीय चाचणी झाली. त्यात त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे समोर आले. तसेच बसमध्येही कुठला बिघाड नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच अनुभव नसणे हे एकमेव कारण बस अपतातामागे दिसत आहे. अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे.

संजय मोरे

पॉवर स्टेअरिंगचा सराव नव्हता

संजय मोरे हा कंत्राटी चालक. त्याला लहान आकाराच्या आणि बेस्टच्या जुन्या बस चालवण्याचा सराव होता. या पद्धतीच्या बसेसमध्ये पॉवर स्टेअरिंग ही संकल्पना नव्हती. त्यामुळे त्या बसेस चालवणे आणि पॉवर स्टेअरिंग असणाऱ्या बसेस चालवणे यामध्ये बराच फरक आहे. आता संजय मोरे याला चालवण्यासाठी दिलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये पॉवर स्टेअरिंग होते. पॉवर स्टेअरिंग असलेली ही इलेक्ट्रीक बस वळवण्यासाठी फार जोर लागत नाही. यामुळे ज्या लोकांना जुन्या स्टेअरिंगची वाहने चालवण्याचा सराव आहे, त्यांना थेट पॉवर स्टेअरिंग असलेली वाहने दिले तर ते चालवणे त्यांना अवघड होते. कुर्ला अपघाताचा प्रकार संजय मोरे याला पॉवर स्टेअरिंगचा अंदाज न आल्याने घडल्याची शक्यता आहे.

बारा वर्षांपूर्वी पुण्यात काय घडले?

मुंबईत कुर्लात झालेला प्रकार बारा वर्षांपूर्वी पुणे शहरात घडला होता. 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील स्वारगेट बस डेपो कार्यरत असलेल्या संतोष माने याने दारुच्या नशेत स्वारगेट स्थानकातून पीएमटीची बस काढली. त्यानंतर बेदरकारपणे पुण्यातील रस्त्यांवर फिरवली. रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना त्याच्या बसने धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. ती घटना आठवल्यावर पुणेकरांचा आजही थरकाप उडतो. संतोष माने याला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत केली.

संतोष माने यांने पुण्यात केलेला अपघात.

फाशीची शिक्षा जन्मठेपेत

संतोष माने याने केलेल्या या प्रकाराची चर्चा देशभर गाजली. संतोष माने हा सोलापूर जिल्ह्यातील कवथळे या गावातील रहिवासी होता. पीएमटीमध्ये 13 वर्षे त्याने काम केले होते. त्याने रात्रीची शिफ्ट दिवसा करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. परंतु त्याची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे त्याने रागाच्या भरात बस काढली. ही बस मास्टर चावीने सुरु केली. त्यानंतर जवळपास 15 किमीपर्यंत भरधाव चालवली. रस्त्याने जो येईल त्याला धडक दिली होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने बसमध्ये शिरत त्याला बसमधून बाहेर काढले अन् ही बस थांबवली होती. या प्रकरणी संतोष माने याच्यावर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात खटला चालला. त्यानंतर 8 एप्रिल 2013 ला पुणे कोर्टाने संतोष माने याला या प्रकरणात फाशीची शिक्षा दिली. संतोष माने याने हे कृत्य वेडाच्या भरात केला, असा दावा त्याच्याकडून करण्यात आला. त्यासाठी गुन्हे माफ करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील कोर्टाच्या निर्णयास आव्हान दिले. पुरावे म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचे दोन अहवाल दिले. परंतु कोर्टाने ते अमान्य करत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत रुपांतरीत केली.

निलेश सांवतने केला तसा प्रकार

2023 मध्ये संतोष माने सारखा प्रकार पुण्यात पुन्हा घडला. पीएमटी बसचालक निलेश सावंत याने दारु पिऊन उलटी बस चालवली. त्याने दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली. पुण्यातील सेनापती बापट रोड, वेताळबाबा चौकात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव मुठीत आला होता. या अपघातामध्ये काही प्रवासी आणि वाहनचालकांना दुखापत झाली होती. सुदैव चांगले होते, यामुळे या अपघातात जीवीत हानी झाली नाही.

बेस्ट अपघात आणि पीएमटी अपघात दोन्ही प्रकार चालकाच्या चुकीमुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचे समोर येत आहे. संतोष माने प्रकरणामुळे बस चालकांनी मानसिक परिस्थिती मनोसपोचार तज्ज्ञांकडून दर सहा महिन्यांनी तपासून घेतली पाहिजे. अन्यथा मनोरुग्ण असलेल्या व्यक्ती संतापाच्या भरात असे कृत्य करतात. दुसरीकडे एखाद्या चालकांनी अनुभव नसताना एखादी बस चालवण्यास देताना दोघांमधील तंत्रज्ञानाचा फरक तरी समजून घेतला पाहिजे. कोणत्याही चालकांची नियमित तपासणी व्हायला पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण दिले म्हणजे म्हणजे असे प्रकार भविष्यात होणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?