‘दिल मिल गए’ मधील डॉ रिद्धिमाला ओळखणं कठीण, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो समोर
Dill Mill Gayye: प्रसिद्ध ‘दिल मिल गए’ या प्रसिद्ध मालिकेने 2008 ते 2010 पर्यंत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिका रुग्णालयावर आधारित ‘संजीवनी’ (2002) मालिकेचा दुसरा भाग होती. मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री शिल्पा आनंद होती. जिने डॉ. रिद्धिमा या भूमिकेला न्याय दिला. मालिकेतील अरमान आणि रिद्धिमा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सांगायचं झालं तर, शिल्पा आनंद हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. पण तिला प्रसिद्धी आणि लोकप्रियता ‘दिल मिल गए’ मालिकेतून मिळाली.
रिपोर्टनुसार, 10 डिसेंबर 1982 मध्ये साउथ अफ्रिका येथे जन्मलेल्या शिल्पा हिचं शिक्षण देखील तेथेच पूर्ण झालं. त्यानंतर अभिनेत्री होण्यासाठी शिल्पा भारतात आली. शिल्पाने 40 कमर्शियल जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम केलं. ज्यात आमिर खानसोबत ‘कोका कोला’, ऐश्वर्या रायसोबत ‘लक्स सोप’ आणि अमिताभ बच्चनसोबत ‘नेरोलॅक’ सारख्या ब्रँडच्या जाहिरातींचा समावेश होता.
शिल्पा आनंद हिचं खरं नाव
भारतात आल्यानंतर शिल्पा हिने स्वतःचं नाव बदललं. अभिनेत्रीला स्वतःचं नाव फार सामान्य वाटत होतं. ज्यामुळे अभिनेत्रीने स्वतःचं नाव बदललं आणि ओहाना शिवानंद असं नवीन नाव ठेवलं. अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर शिल्पा हिने साऊथ इंडस्ड्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
बॉलिवूडमध्ये देखील शिल्पाने काम केलं. पण तिला हवीतशी लोकप्रियता मिळाली नाही. अखेर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा टीव्ही इंडस्ड्रीच्या दिशेने वळवळा… 2007 मध्ये अभिनेत्रीने ‘दिल मिल गए’ मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
दरम्यान, अनेक वर्षांपासून गायब असलेल्या, शिल्पा आनंदची एक पोस्ट समोर आली आणि ज्यामध्ये एका जवळच्या मित्राने शिल्पाला जीवेमारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली. एक वर्षापूर्वी शिल्पा मुंबईत राहत होती. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री सक्रिय होती. पण मध्येच गायब झाली.
आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ओहाना शिवानंद नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्रीने फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा बदलेला लूक चाहत्यांना चकित करत आहे. अनेक वर्षांनंतर शिल्पाला पाहिल्यानंतर अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List