कॉमेडीयन सुनील पाल यांनी स्वत:च्या अपहरणाचा कट रचला? ऑडिओ क्लीपने वेगळे वळण
प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याचे अलिकडे अपहरण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. याबातमीने त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकले होते. सुनील पाल यांच्याकडे अपहरणकर्त्यांनी २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. परंतू ७.५ लाख रुपये दिल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे युपीतील मेरठशी जोडेलेले होते.परंतू या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार सुनील पाल यांचं अपहरण झाले नसून त्यांनी त्यांच्या अपहरणाचा कट रचल्याचे म्हटले जात आहे.
या प्रकरणात मेरठ पोलिसांनी ताजा अपडेट देत कोणतेही अपहरण झाले नसल्याचा दावा केला आहे. सुनील पाल यांनी स्वत:च आपल्या अपहरणाचा बनाव रचल्याचे म्हटले आहे. या संदर्भात सुनील पाल यांचा ऑडीओ व्हायरल झाले आहे.आता युपी पोलिस मुंबई पोलिसांशी बोलून या प्रकरणातील सत्य बाहेर आणतील असे म्हटले जात आहे. या प्रकरणात सुनील पाल यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओत मिडिया आणि सायबर क्राईमवाल्यांनी पकडले आहे.आता आपण कोणतीही पोलिस तक्रार केलेली नाही असे वाक्य ऐकायला मिळत आहेत.
सहा लाखांचे दागिने खरेदी केले
या प्रकरणात मेरठच्या दोन व्यापाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की मुंबई पोलिसांनी लेन-देण प्रकरणात त्यांची दोन खाती गोठवली आहेत. तपास केला तेव्हा समजले की अपहरणकर्त्यांनी या खंडणीतून सहा लाखांचे दागिने खरेदी केले होते. अपहरण दिल्लीतून झाले होते. आणि २० लाखांची खंडणी मागितली होती. जे पैसे सुनील पाल यांनी दिले त्यातून अपहरणकर्त्यांनी दागिने खरेदी केले होते. आता या प्रकरणाचा एक वेगळाच एंगल समोर आला आहे. सुनील पाल आणि अपहरणकर्त्यांची बातचीत झाल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल टेपने सर्व साफ झाले आहे.
असे झाले संभाषण –
सुनील पाल – त्याने कोणाला काही सांगितले की यार बघ आता गळ्यात पडले तर काही ना काही सांगावेच लागेल
अपहरणकर्ता – भाई हो, तर सर गोष्ट तर ही आहे ना जसे तुम्ही सांगितले तसे आम्ही केले. तरी तुम्ही असे म्हणत असाल तर हे वाईट आहे ना
सुनील पाल – घाबरु नका. मी तुमचे कोणाचे नाव सांगितलेले नाही.आणि कोणाचे काही सापडले नाही. मी एवढेच बोललो की..आणि पोलिस तक्रार करु शकत नाहीए..
अपहरणकर्ता – तुम्ही पत्नीला सांगितलं नव्हतं का ? काय यात सामील नाही केले नव्हते का आधीच ? काय तुम्ही जे वाईफने केले ना तुमचे आहे?
सुनील पाल -अरे संपूर्ण मिडिया ते सर्व चॅनल्सवाले सर्वानी सायबर क्राईम्सकडून हे पकडले ना ? काय करायचे आता. हे सर्व काही ना काही सांगावे लागेलच ना भाई ?
अपहरणकर्ता – हा, मग पाहून घ्या सर, तुमच्या मनाला वाटेल तसे करा आता. आम्ही तुमच्या पाठी आहोत
सुनील पाल – जेवढे वाचणे शक्य तेवढा प्रयत्न करीत आहे, मी कम्प्लेंटही केलेली नाही
अपहरणकर्ता – आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जसे तुम्ही सांगाल तसेच करु, मी काय म्हणतो भेटणार कधी आपण?
सुनील पाल – आता भेटायचे नाही.अडचण होईल. जसा असाल तसे ठीक राहा, ठीक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List