किस्से, खसखस… आणि बरंच काही! रिमा कपूर म्हणाल्या, ‘आदरणीय प्रधानमंत्रीजी….’, मोदी म्हणाले, ‘कट’, नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबियांची भेट
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत जेष्ठ नेते राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आज कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज कपूर यांची येत्या 14 डिसेंबरला जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबियांची भेट घडून आली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या भेटीने कपूर कुटुंबीय भारावून गेलेले बघायला मिळाले. नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबियांच्या भेटीचे फोटो याआधी समोर आले होते. पण आता या भेटीचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिमा कपूर, सैफ अली खान, करीना कपूर, नीतू कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, निखिल नंदा, रिद्धिमा कपूर साहनी आणि भरत साहनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बातचित करताना बघायला मिळत आहेत.
या व्हिडीओत सुरुवातीला रणबीर कपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलताना दिसतो. पंतप्रधानांनी आपल्या कुटुंबाला भेटायला बोलावणं ही आमच्यासाठी गौरावाची गोष्ट आहे. आपल्या भेटीचं एक वेगळं दडपण आमच्यावर होतं. आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आम्ही एकमेकांना प्रश्न विचारत होतो की, आपल्यासोबत कसं बोलावं, काय चर्चा करावी, असं रणबीर कपूर बोलताना दिसतो. “आपल्याला प्राईम मिनिस्टरजी बोलावं की पंतप्रधानजी बोलावं हे आम्ही ठरवत होतो. रिमा आत्या तर मला दररोज फोन करुन विचारत होती की, मी हे बोलू का, ते विचारु का”, असं रणबीर कपूर पंतप्रधान मोदी यांच्यासमोर बोलतो.
मी सुद्धा तुमच्याच कुटुंबातला : मोदी
यानंतर मोदी म्हणाले की, “मी सुद्धा तुमच्याच कुटुंबाचा आहे. तुम्हाला मनात वाटेल ते मला बोलू शकता.” यानंतर राज कपूर यांची मुलगी रिमा कपूर अडखळत “आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी…” असं बोलतात आणि तेवढ्यात मोदी एकदम फिल्मी स्टाईलने ‘कट’ असं बोलतात. त्यानंतर सर्वजण हसायला लागतात. रिमा त्यानंतर पुढे बोलू लागतात. “एवढ्या मौल्यवान वेळेत आपण आम्हा सर्वांना राज कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमंत्रित केलं, आम्ही आपले आभार मानतो. मला माझ्या वडिलांच्या चित्रपटाच्या दोन ओळी आठवत आहेत. मैं ना रहुँगी तुम ना रहोगे, लेकिन रहेंगी निशानियाँ. आपण एवढं प्रेम आणि सन्मान दिला, आजच्या या दिवसाला संपूर्ण भारत पाहिल. नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान, त्यांनी आम्हाला किती सन्मान दिला”, असं रिमा कपूर म्हणाल्या.
राज कपूर यांचं खूप मोठं योगदान : मोदी
“राज कपूर यांचं खूप मोठं योगदान आहे. आपलं स्वागत करण्याची संधी मिळाली. राज कपूर यांचा 100 वा जन्मदिवस म्हणजे भारताच्या चित्रपटसृष्टीचा सुवर्णयात्रेचा तो कालखंड आहे. 1947 चं नीलकमल, आता 2047 मध्ये आपण जात आहोत. आता 100 वर्षांचा सुवर्ण काळ जेव्हा बनेल तेव्हा देशाला किती मोठं योगदान राहील. राज कपूर यांचं देशासाठी मोठं योगदान आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
रिमा कपूर ‘तो’ किस्सा सांगतात
यानंतर रिमा कपूर आपल्या वडिलांच्या कीर्तीमुळे आपल्या कुटुंबाला प्रेक्षकांचं कसं प्रेम मिळतं याचा एक किस्सा सांगतात. राज कपूर यांच्यामुळे रणबीरला अनेकदा त्यांचा नातू असल्याचं सांगितल्यानंतर रशियात मोफत टॅक्सी मिळाल्यंच रिमा कपूर यावेळी सांगतात.
एक काम होऊ शकतं का? मोदींची कपूर कुटुंबियांना विनंती
“एक काम होऊ शकतं का? विशेषत: मध्य आशियात, असा चित्रपट बनवा की तिथल्या लोकांच्या मनावर आणि डोक्यात प्रभाव टाकेल, राज कपूर यांचा आजही प्रेक्षकांवर प्रभाव आहे, त्यांच्या जीवनावर प्रभाव आहे. सेंट्रल आशियात मोठी ताकद आहे. आपल्याला ते पुनर्जिवित करायला हवं, आपल्याला नव्या पिढीसोबत जोडायला हवं आणि एक लिंक बनावं असं काहीतरी क्रिएटिव्ह बनायला हवं आणि ते बनू शकतं”, असं मोदी म्हणाले.
‘हे बघा देशाची प्रतिष्ठा आज खूप मोठी’ म्हणत, मोदींनी किस्सा सांगितला
यानंतर रिमा कपूर व्हिडीओत बोलताना दिसतात. “राज कपूर यांना एवढा प्रेम मिळालं की त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेम मिळालं. आमच्या पंतप्रधानांनीसुद्धा आम्हाला ग्लोबल मॅपवर टाकलं आहे”, असं रिमा कपूर म्हणाल्या. “हे बघा देशाची प्रतिष्ठा आज खूप मोठी आहे. फक्त योगा बघा. आज दुनियाच्या कुठल्याही देशात जाऊन बघा. प्रत्येक ठिकाणी योगाला महत्त्व आहे. मी जगातील जितक्या मोठमोठ्या नेत्यांना भेटतो, दुपारची जेवण जर सोबत आहे तर माझ्या आजूबाजूला जेवढे आहेत ते माझ्याकडून योगा शिक्षणासाठी विचारतात”, असं मोदी म्हणाले.
पराभवानंतर वाजपेयी आणि आडवाणी यांनी पाहिलेला चित्रपट
“मला आजही आठवतं की, चित्रपटांची ताकद काय होती. जनसंघचा जमाना होता आणि दिल्लीची निवडणूक होती. निवडणुकीत जनसंघाचे लोकं हारली. तेव्हा आडवाणी आणि अटलजी म्हणाले की, निवडणुकीत पराभवी झालो. आता काय करावं? तर असं ठरलं की, चला चित्रपट बघायला जाऊयात. राज कपूर यांचा तेव्हा ‘फिर सुबह होंगी’ हा चित्रपट सिनेमागृहात होता. जनसंघाचे दोन नेते पराभवानंतर चित्रपटगृहात जातात आणि फिर सुबह होंगी हा चित्रपट पाहतात आणि आज फिर सुबह झाली”, असा किस्सा नरेंद्र मोदी सांगतात.
मोदींनी ऋषी कपूर यांना पाठवलेला चीनमधला व्हिडीओ
“मी चायनामध्ये होतो. तुमच्या वडिलांचं एक गाणं होतं. ते लावत होते. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की, हे गाणं मोबाईलवर रेकॉर्ड करा आणि मी ऋषी साहेबांना पाठवलं होतं. ते खूप आनंदी झाले होते”, अशी आठवण मोदी रणबीर कपूर याच्यासोबत शेअर करतात. यावेळी आलीय भट्ट मोदींशी संवाद साधते.
आलियाचा नरेंद्र मोदी यांना प्रश्न, मोदींचं उत्तर काय?
“आपण आफ्रिकेत गेला होता. तेव्हा तिथल्या एका जवानासोबत उभे असताना तो जवान त्यावेळी माझं गाणं गात होता. त्याची क्लिप समोर आली होती. अनेकांनी मला ती क्लिप पाठवली होती. सर्व लोक खूप खूश झाले होते. पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते की, गाणं हे जगाला एकत्र आणतात. विशेषत: हिंदी गाणं, लोकं गातच राहतात. मग ते राज कपूर यांचेदेखील गाणी गातात. कदाचित त्यांना शब्द समजत नसतील. पण ते ऐकत असतात. गात असतात. आपण प्रवास करताना हे आपल्याला बघायला मिळतं. आतासुद्धा. आपली गाणी सर्वांना कनेक्टक करतात. माझा एक आपल्याला प्रश्न होता की, आपण गाणी ऐकतात का?”, असा प्रस्न आलिया मोदींना विचारते. त्यावर मोदी हो मी गाणी ऐकतो. कारण मला चांगलं वाटतं. मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी नक्की गाणी ऐकतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आपण पहिले पंतप्रधान आहात, ज्यांच्यासोबत…: सैफ अली खान
यावेळी सैफ अली खान हा सुद्धा मोदींसोबत बातचित करतो. “आपण पहिले पंतप्रधान आहात, ज्यांच्यासोबत मला भेटता आलं आहे. आपण डोळ्यांमध्ये डोळे टाकून वैयक्तिकरित्या सर्वांना भेटलात. आपण दोनवेळा भेटलात. आपल्यात एवढी चांगली एनर्जी आहे. आपण इतकं काम करतात. आपण जे करतात त्यामुळे मी आपलं अभिनंदन करु इच्छितो. आपण आमच्यासाठी दरवाजे उघड केले त्यासाठी धन्यवाद. आम्हा सर्वांना भेटल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप धन्यवाद”, असं सैफ अली खान बोलतो. त्यावर मोदीदेखील आपली भूमिका मांडतात.
“मी आपल्या वडिलांनादेखील भेटलो आहे. मी विचार करत होतो की, मला तीन पिढींना भेटायची संधी मिळेल. पण आपण तिसरी पिढीला आणलं नाही”, असं मोदी म्हणतात. त्यानंतर सर्वजणांना हसू येतं. त्यावर करिना कपूर म्हणते, “त्यांना आणायची इच्छा होती.”
पाहा संपूर्ण व्हिडीओ:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List