“आई शप्पथ रोजगार मिळताच…”; अपहरणकर्त्यांनीच सुनिल पालला केलं भावूक

“आई शप्पथ रोजगार मिळताच…”; अपहरणकर्त्यांनीच सुनिल पालला केलं भावूक

प्रसिद्ध कॉमेडियन सुनिल पालला एका खासगी कार्यक्रमासाठी हरिद्वारला जात असताना अत्यंत धक्कादायक अनुभव आला. काही अपहरणकर्त्यांनी सुनिलचं अपहरण करून त्याला 24 तासांसाठी ओलिस ठेवलं होतं. त्याच्या सुटकेसाठी त्यांनी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. आयुष्यातील हा सर्वांत धक्कादायक अनुभव असल्याचं सुनिलने सुटकेनंतर म्हटलंय. इतकंच नव्हे तर या घटनेला आता भावनिक वळणही मिळालं आहे. सुटकेनंतर अपहरणकर्त्यांनी असं काही म्हटलं, जे ऐकून खुद्द सुनिलसुद्धा भावूक झाला होता.

अपहरण कसं झालं?

सुनिल पालला अनिल नावाच्या एका व्यक्तीने फोन केला आणि म्हटलं, “मी तुम्हाला खूप वेळा भेटलोय. हरिद्वारमध्ये एका मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आम्हाला तुमचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे.” सर्व गोष्टींची चर्चा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने सुनिलच्या अकाऊंटमध्ये काही पैसे ॲडव्हान्स म्हणून पाठवले. अनिलने दरभंगाहून दिल्लीसाठी विमानाचं तिकिटसुद्धा काढून दिलं होतं. ठरलेल्या वेळेनुसार सुनिल सकाळी 6.30 वाजता दिल्ली एअरपोर्टवर पोहोचला. त्याच्यासाठी एअरपोर्टवर कार पाठवण्यात आली होती. त्या कारने तो हरिद्वारसाठी रवाना झाला होता.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील दुसरा टोल प्लाझा ओलांडल्यानंतर कारचालकाने एका ढाब्याबाहेर गाडी थांबवली, जेणेकरून सुनिल पाल नाश्ता करून त्याची औषधं घेऊ शकेल. त्याचवेळी तीन जण त्याच्याजवळ आले आणि चाहते असल्याचं सांगून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान एका तरुणाने सुनिलला त्याच्या कारजवळ नेलं आणि ढकलून त्याला कारमध्ये बळजबरीने बसवलं. “शांत बस, तुझं अपहरण झालंय”, असं म्हणून त्या तरुणाने सुनिलच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि एका घरात त्याला डांबून ठेवलं.

20 लाख रुपयांची मागणी

अपहरणकर्त्यांनी सुनिलकडे आधी 20 दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. माझ्याकडे एवढी रक्कम नसल्याचं सुनिलने सांगितल्यानंतर त्यांनी सुनिलच्या मित्रांना त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. सुनिलला नंतर याबद्दलची माहिती मिळाली की त्याचा मोबाइल काही ज्वेलर्सच्या ठिकाणाहून खरेदीसाठी वापरला गेला. अपहरणकर्त्यांकडे कोणतंही हत्यार किंवा शस्त्र नव्हतं. परंतु त्यांनी विषाचं इंजेक्शन देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. डोळ्यावरील पट्टी काढल्यावर सुनिलला प्रत्येक अपहरणकर्त्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसला. सात ते आठ जणांनी सुनिलचं अपहरण केलं होतं आणि त्यापैकी काहीजण मद्यधुंद अवस्थेत होते.

बेरोजगारीमुळे अपहरण

20 लाख रुपये माझ्याकडे नसल्याचं सुनिलने सांगितल्यानंतर अपहरकर्त्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सुनिलने त्याच्या मुंबईतील काही मित्रांना फोन केला आणि साडेसात ते आठ लाख रुपये जमा केले. हे पैसे दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याची सुटका केली. इतकंच नव्हे तर त्यांनी त्याला विमानाने घरी परतण्यासाठी 20 हजार रुपये दिले. सुनिलची सुटका करताना अपहरणकर्ते त्याला म्हणाले, “आम्ही वाईट नाही आहोत. नाइलाजाने आम्ही असं करतोय कारण आम्ही बेरोजगार आहोत. आई शप्पथ रोजगार मिळताच आम्ही तुमचे पूर्ण पैसे परत करू.”

या संपूर्ण घटनेचा सुनिल पालने चांगलाच धसका घेतला असून पोलिसांत एफआयआर नोंदवावी की नाही, याविषयी तो पुनर्विचार करत आहे. “पोलिसांनी मला केस दाखल करण्यास सांगितलं आहे. पण मी अजूनही खूप धक्क्यात आहे. मी केस दाखल करावी की नाही असा विचार करतोय. त्यांनी मला धमकी दिली नव्हती, पण मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली तर माझ्या कुटुंबीयांना ते हानी पोहोचवतील याची भीती मला आहे. याबद्दल विचार करण्यासाठी मला आणखी काही वेळ हवा आहे”, असं सुनिल म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझे...
गुणरत्न सदावर्ते लवकरच झळकणार चित्रपटात, निर्माते-दिग्दर्शकांसोबत बोलणं सुरु, तारीखही निश्चित?
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल ‘या’ लोकांसाठी ठरते घातक… एकदा नक्की वाचा
Video – बीड, परभणी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; सरकारला फटकारले
दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा
Video – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा; ईडी, सीबीआयला वरून आदेश आला! अरविंद केजरीवाल याचा खळबळजनक आरोप
मिंधेंच्या खासदाराचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; पोलिसांची हप्ते वसुली, सामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप