सुनील पाल प्रमाणे या बॉलिवूड अभिनेत्याचेही अपहरण, कार्यक्रमासाठी बोलवले आणि…

सुनील पाल प्रमाणे या बॉलिवूड अभिनेत्याचेही अपहरण, कार्यक्रमासाठी बोलवले आणि…

सुनील पाल अपहरण प्रकरण ताजं असतानाच आणखी एका बॉलिवूड कलाकाराचे अपहरण करुन त्याच्याकडून २ लाख रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आले आहे. बिजनौरमध्ये एका कार्यक्रमासाठी बोलवून चित्रपट अभिनेते मुस्ताक खान यांचं अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून तब्बल 2 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर येत आहे. पैसे मिळत नाही तोपर्यंत त्यांना ओलीस ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी संधी मिळताच मुस्ताक खान तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मुस्ताक खान यांचे इव्हेंट मॅनेजर शिवम यादव यांच्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरला मेरठमधील राहुल सैनी या व्यक्तीने मुस्ताक खान यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्याचा फोन केला होता. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुस्ताक खान हे 20 नोव्हेंबरला मुंबईहून दिल्लीला पोहोचले. तिथे एक कॅब आधीच त्यांची वाट बघत होती. पण दिल्ली विमानतळावरुन बाहेर आल्यानंतर लगेचच एका शिकंजी स्टॉलवर ती कॅब थांबवली. त्या कॅबमधून त्यांना उतरवण्यात आलं आणि दुसऱ्या वाहनात बसवलं. पुढे काही अंतर गेल्यानंतर आणखी दोन जण गाडीत येऊन बसले. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुस्ताक यांना पकडून अज्ञातस्थळी नेले.

अज्ञात स्थळी नेल्यानंतर मुस्ताक खान यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडे एटीएम नसल्याने अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरून 2 लाख रुपये खात्यात ट्रान्सफर केले. अपहरणकर्त्यांनी पैसे मिळाल्यानंतर मद्यपानाची पार्टी केली. जेव्हा सकाळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्याचा फायदा घेत मुस्ताक खान हे तेथून पळून एका मशिदीत पोहोचले आणि त्या ठिकाणी लोकांकडे मदत मागितली. यावेळी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मौलवींना दिली.

मुस्ताक खान यांनी त्यानंतर त्यांच्या ओळखीच्या लोकांना तेथे बोलवले. मशिदीच्या आसपासच्या लोकांनी त्यांना मुंबईला पाठवले. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी आपला इव्हेंट मॅनेजर आणि कुटुंबीय यांना घटलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर इव्हेंट मॅनेजर शिवम यादव याने पोलिसात तक्रार दाखल केली.

कोतवाली शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 140 (2) नुसार अपहरण, ओलीस ठेवणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस सध्या या टोळीचा शोध घेत आहेत. सुनील पाल यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर ही घटना समोर आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार