मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये ‘वर्षा’वर एक तास बैठक; शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार?

मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये ‘वर्षा’वर एक तास बैठक; शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार?

राज्यात फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रि अजित पवार यांचा शपथविधी झाला. खरंतर या दिवशी फडणवीस सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अल्पावधीचा असल्याने संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही. त्या दिवशी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथ विधी झाला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल याबाबत महत्वाची बैठक पार पडली आहे.

काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ निवासस्थानी फडणवीस आणि शिंदेंमध्ये एक तासभर चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनावर चर्चा झाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे.

सध्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. 7 डिसेंबरला हे अधिवेशन सुरु झालं. तर आज 9 डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे.

येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तसंच 11 डिसेंबरला हा शपथविधी होऊ शकतो, असं महायुतीतीलच काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?