ईव्हीएमच्या वादात आता अभिजीत बिचुकलेंची उडी, थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज, म्हणाले मी पवारांच्या पाठिमागे उभा त्यांनी..

ईव्हीएमच्या वादात आता अभिजीत बिचुकलेंची उडी, थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज, म्हणाले मी पवारांच्या पाठिमागे उभा त्यांनी..

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली.  या पराभवातून सावरत महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 231 उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा फटका बसला. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाचं जिंकता आल्या. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या वादात आता अभिजी बिचुकले यांनी देखील उडी घेतली आहे. ईव्हीएमवरून त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले अभिजीत बिचुकले?   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावं की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही, असं आव्हान बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन सांगावं की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नाही. शरद पवार साहेबांचा एवढा दारून पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही. पवार साहेबांनी यावर ठोस पाऊल उचलावं मी पवार साहेबांच्या मागे उभा आहे. शरद पवारांना ईव्हीएम विरोधात आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे. यासाठी पवार साहेबांनी धाडसी पाऊल उचलावं, मी पवार साहेबांचा पाठीराख म्हणून मागे उभा राहील असं बिचकुले यांनी म्हटलं आहे.

बारामतीमध्ये मला 200 मतं पडायला हवी होती, पण मला केवळ 92 च मते कशी मिळाली असा सवालही यावेळी अभिजित बिचुकले यांनी उपस्थित केला आहे.  राज्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मी दिलं, लोक माझ्यासोबत फोटो काढायला गर्दी करतात मग माझी मतं जातात कुठं, असंही यावेळी बिचकुले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करत सवाल केला आहे. काँग्रेसला 80 लाख मतं पडली पण त्यांचे 16 च आमदार निवडून आले, मात्र शिवसेना शिंदे गटाला 79 लाख काँग्रेसपेक्षा एक लाख मतं कमी पडली तरी त्यांचे 57 आमदार निवडून आले असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?