बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण…

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण…

Bollywood Actress Life: झगमगत्या विश्वातील काही रहस्य समोर आल्यानंतर धक्का बसतो. आता देखील अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने लग्न झालेलं नसताना दिग्दर्शकाची पत्नी म्हणून संपूर्ण आयुष्य घालावलं. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. पण लग्नाआधीच अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं. बॉयफ्रेंडच्या निधनानंतर अभिनेत्री कधीच दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. अभिनेत्रीने पांढऱ्या साडीमध्ये स्वतःचं आयुष्य घालवलं…

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नंदा कर्नाटकी आहे. नंदा यांनी 3 दशक म्हणजे तब्बल 30 वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी नंदा यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. तरुण वयातच नंदा यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल टाकावं लागलं. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंदिर’ या सिनेमातून नंदा यांनी बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केली.

त्यानंतर 1956 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुफान और दिया’ सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यानंतर नंदा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाह. बॉलिवूडला दमदार सिनेमे देत नंदा यशाच्या शिखरावर चढल्या. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना त्यांच्या आयुष्यात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांची एन्ट्री झाली.

मनमोहन देसाई यांना अभिनेत्री नंदा कर्नाटकी यांच्यावर खूप प्रेम होतं, पण ते कधीही उघडपणे प्रेम व्यक्त करू शकले नाहीत. बॉलिवूडमध्ये गजलेला एक किस्सा सांगायचा झाला तर, मनमोहन देसाई यांनी जीवन प्रभा यांच्यासोबत लग्न केलं. त्यामागे देखील एक कारण होतं. जीवन प्रभा या नंदा यांच्यासारख्या दिसायच्या म्हणून… पण यामध्ये तथ्य किती आहे… याची काही कल्पना नाही.

दरम्यान, काही दिवसांनंतर मनमोहन यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर मनमोहन आणि नंदा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. यावेळी दोघांनीही आपलं नातं पूर्ण करायचं ठरवलं आणि साखरपुडा केला. साखरपुड्याच्या अवघ्या दोन वर्षांनी मनमोहन देसाई यांचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला, त्यानंतर नंदा यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर नंदा यांनी कधीच दुसऱ्या पुरुषाचा विचार केला नाही. आयुष्यभर त्यांनी विधवा म्हणून राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आयुष्यभर एकटे राहणाऱ्या कर्नाटकातील नंदा यांनी 20214 साली जगाचा कायमचा निरोप घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?