फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; शिंदे गटाला गृहमंत्री पद देणार नाही

फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; शिंदे गटाला गृहमंत्री पद देणार नाही

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर खातेवाटपावर तीनही पक्षाच्या नेत्यांत काथ्याकूट सुरू आहे. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे गृह, महसूल, नगरविकास यासारख्या मलईदार खात्यांसाठी अडून बसले आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला गृहमंत्री पद देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारत सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी महायुतीत गृहमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. फडणवीस यांनी यासंदर्भात अद्याप जाहीरपणे भाष्य केलेले नव्हते, मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यानी गृहमंत्री पदाबाबतची भूमिका स्पष्ट केली. गृहमंत्री पद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो. त्यामुळे गृह मंत्रालय भाजपकडेच असायला हवे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

या राज्यात नक्षलवादाची समस्या आहे, मुंबईसारखे मोठे शहर सांभाळायचे आहे. या शहराची परिस्थिती खूप नाजूकपणे हाताळावी लागते. ही एक प्रकारे देशाची राजधानी आहे. माझा भाजपच्या पेंद्रीय नेतृत्वाशी नेहमी संपर्क असतो. आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय राखतो. मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो, असे सांगत फडणवीस यांनी गृह खात्याचा कारभार एकनाथ शिंदेंकडे देण्यास नकार दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?