भाजप मोफत वीज बंद करणार, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा दावा
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले आहेत की, भाजपनेच घोषणा केली आहे की, ते सर्व काही बदलतील. म्हणजेच ते मोफत वीज बंद करतील. ‘अब नहीं सहेंगे, बदल के रहेंगे’ या भाजपच्या नव्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले. ज्याची भीती होती तेच घडले असे त्यांनी म्हटले आहे. सर्व काही बदलणार असल्याची अधिकृत घोषणा भाजपने केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ”आज भाजपने नारा दिला आहे – ‘अब नहीं सहेंगे, बदल के रहेंगे’. मी याआधीच म्हणालो होतो, त्यांना मते दिले तर, आम आदमी पक्षाच्या सरकारने दहा वर्षात दिल्लीतील जनतेसोबत केलेली सर्व कामे ते थांबवतील.”
ते पुढे म्हणाले, ”आज त्यांनी सर्व काही बदलणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. म्हणजे 24 तास वीज बंद होईल, मग दीर्घकाळ वीज कपात सुरू होईल, मोफत वीज बंद होईल. महिन्याला हजारो रुपयांची वीजबिल येऊ लागेल, महिलांचा मोफत बस प्रवास बंद होईल, सर्व सरकारी शाळा उद्ध्वस्त होतील. पुन्हा सर्व मोहल्ला दवाखाने बंद होतील, सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे व उपचार बंद होतील. खूप विचारपूर्वक मतदान करा. त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List