शरद पवारांना आणखी एक धक्का बसणार? शपथविधिच्या तिसऱ्याच दिवशी बड्या नेत्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत?

शरद पवारांना आणखी एक धक्का बसणार? शपथविधिच्या तिसऱ्याच दिवशी बड्या नेत्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत?

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदललेली आहे, कधी मी भाजपमध्ये होतो, त्यानंतर  राष्ट्रवादीमध्ये परत आलो पुन्हा मी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे  देवेंद्र फडणवीस यांच्याशी तात्विक मतभेद माझे होते. आजही आहेत, पुढच्या कालखंडात कदाचित मिटू शकतील असं खडसे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे? 

राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदललेली आहे, कधी मी भाजपमध्ये होतो, त्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये परत आलो, पुन्हा मी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला. व्यक्तिगत द्वेष नसतो. राजकीय दृष्या  एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत एकमेकांची दुश्मनी असते असं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी तात्विक मतभेद माझे होते. आजही आहेत. पुढच्या कालखंडात कदाचित मिटू शकतील. भारत – पाकिस्तान प्रमाणे आमच्यामध्ये युद्ध चाललं होतं असं काही नव्हतं. एकमेकांबद्दल काही काळ तणाव असू शकतो. आजही देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, आजही त्यांच्याशी माझं बोलणं होतं. दिल जमाई हा विषय नाही. मात्र तात्विक मतभेद मिटले तर एकमेकांशी अधिक जवळचा संबंध येऊ शकतो.

दरम्यान पुढे बोलताना खडसे यांनी म्हटलं की,  सोबत न यायला काय झालं? आमचं काय भारत पाकिस्तानचे युद्ध आहे का? असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यामुळे यातून पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  राजकीय जीवनामध्ये तुम्हाला वेळेनुसार भूमिका या नक्की बदलाव्याच लागतात. स्वीकारावा लागतात असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय
मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?