केंद्रीय मंत्री आठवले यांनी घेतली अभिनेता गोंविदा यांची भेट, राजकारण, चित्रपटांवर गप्पा आणि कविताही सादर केली
एक्टर टर्न पॉलिटीशियन गोविंदा घरात पिस्तूलातून चुकून गोळी सुटल्याने नुकतेच जखमी झाले होते. त्यानंतर या अपघातातून बरे झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात सहभाग घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिनेता गोविंदा यांची भेट घेतली आहे. या दोघांनी राजकारण आणि चित्रपट या विषयावर मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी गोविंदा यांची वर रामदास आठवले यांनी कविताच सादर केली. ते म्हणाले फिल्म इंडस्ट्री में जिनका नाम अभी भी है जिंदा, उनका नाम Govinda अशा आशयाची कविता सादर करुन त्यांनी गोविंदाला शुभेच्छा दिल्या..
गोविंदा हे दिलखुलास व्यक्तीमत्व आहे. उत्तर मुंबईत कॉंग्रेसचे तिकीट मिळाले होते. त्यावेळी आमचे कॉंग्रेसशी अलायन्स होते. त्यानंतर ते पुन्हा चित्रपटात बिझी झाले. परंतू त्यांना राजकारणातबद्दल आस्था आहे. त्यांना लोकांची सेवा करायची आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेचा गोविंदा आणि आम्ही एकत्र प्रचार केला आहे. महायुतीच्या अनेक सभात ते आल्याने महायुतीला फायदा मिळाल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये असताना आपण गोविंदाचे चित्रपट पाहात होतो असेही आठवले यावेळी म्हणाले.
आरपीआयला एक मंत्रीपद मिळेल अशी आशा
भाजपाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असल्याने आपण शिंदे यांना केंद्रात यावे अशी विनंती केली होती. परंतू त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना महाराष्ट्रातच राजकारण करायचे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा योग्य आदर महायुतीत राखला जाणार आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले. कॉंग्रेसने संविधान बदलणार असा खोटा नेरेटीव्ह सेट केला त्यामुळे लोकसभेत फटका बसला. परंतू विधानसभेत मतदाराचे गैरसमज दूर केले म्हणून महायुतीला इतके मोठे यश मिळाल्याचे आठवले यांनी सांगितले. आरपीआयला एक मंत्री मिळावे अशी मागणीही यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे.
शिंदे यांना गृहमंत्री पद मिळाले तर चांगले होईल
लोकांनी एकनाथ शिंदे यांचे काम पाहिले आणि मतदान केले. त्यामुळे महायुतीला यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नव्या इनिंगसाठी आपल्या शुभेच्छा आहेत असे गोविंदा यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळाल्यास ते स्वत:ला खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकतील, त्यांची इच्छा पूर्ण होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही गोविंदा यांनी सांगितले. मला गोळी लागली त्यावेळी शिल्पाने विचारले होते की भाभी कुठे आहे ? तर मी तिला म्हणालो कि ती बाहेर आहे, मग शिल्पा शेट्टी म्हणाली मग गोळी कोणी मारली? अशा शब्दात शिल्पाने आपली मस्करी केल्याचेही गोंविदा यांनी यावेळी सांगितले. आगामी महानगर पालिका निवडणूकांत एकत्र प्रचार करणार असल्याचे उभयतांनी यावेळी जाहीर केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List