हद्दीच्या वादातून कचरा वेचकाची हत्या, रक्ताच्या डागावरून खुनाचा उलगडा
हद्दीच्या वादातून कचरा वेचकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वसई पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या रक्ताच्या डागावरून खुनाचा उलगडा करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अंकित टेनिराम आणि बबलू रॉय अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी साथीदाराच्या मदतीने राजू मारवाडी याची रेल्वे स्टेशन ब्रीजखाली हत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृतदेह पेटवून पोबारा केला होता.
वसई रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी स्टेशन ब्रीजखाली आग लागल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे, पोलीस निरीक्षक भगवान डांगे, पोलीस निरीक्षक तुंबडा, सहाय्यक निरीक्षक शेख यांनी घटनास्थळी हल्लेखोराचा मृतदेह सापडला
सीसीटीव्हीच्या मदतीने हत्या करणाऱ्या तिघांचा शोध सुरू असताना पोलिसांना प्रकाशचा मृतदेह वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आला. त्याचा मृतदेह पाहून पोलीस संभ्रमात पडले. त्याचीदेखील हत्या झाली असावी असा अंदाज वर्तवत पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता दारूच्या आहारी गेलेल्या प्रकाशचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.
वसई रेल्वे पोलिसांची कारवाई
धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना सदर ठिकाणी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी पोलिसांनी कसोशीने तपास केला असता घटनास्थळी रक्ताचे काही डाग दिसून आले. सर्व नमुने गोळा करत पोलिसांनी तपास करत मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी गुप्त बातमीदार व सीसीटीव्हीच्या मदतीने अधिक तपास केला असता त्यांना राजू मारवाडी याच्यासोबत अंकित टेनिराम, बबलू रॉय व प्रकाश मोरवाल हे तिघे दारू पिण्यासाठी गेल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी अंकित आणि बबलूला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी प्रकाशच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
घड्याळ आणि चेनवरून मृतदेहाची ओळख पटली
होरपळलेल्या मृतदेहाजवळ पोलिसांना कचऱ्याची बॅग मिळून आली. तसेच त्याच्या हातात घड्याळ आणि गळ्यात चेन आढळली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास केला असता त्याचे नाव राजू असून तो वसई बस स्टॅण्ड परिसरात कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List