गंमत कराल तर जंमत होईल! बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही

गंमत कराल तर जंमत होईल! बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही

‘‘लोकसभेला गंमत केली. त्याबद्दल आता मी काही बोलत नाही; पण आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमचीच जंमत होईल,’’ असा उपरोधिक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना दिला.

अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील गावांत प्रचार दौरा काढला. त्या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना हा इशारा दिला. ‘‘काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही, हे लक्षात घ्या,’’ असेही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, ‘‘दीड वर्षाने मी निवडणूक लढवणार नाही आणि खासदारही होणार नाही, असे साहेबांनी सांगितले आहे. त्यांच्यानंतर कोण बसणार आहे, याचा विचार करा. कुणात एवढी धमक आहे, कुणात एवढी ताकद आहे, कोण शब्दाचा पक्का आहे. एवढे आमदार आहेत. पण माझ्याप्रमाणे कोणी करोडो रुपये अपापल्या भागासाठी नेऊ शकले नाही. मी काही चुका केलेल्या नाहीत. भावनिक होऊ नका.’’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क ‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. येत्या 23 नोव्हेंबरला शनिवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह...
मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर राडा, भाजपच्या बड्या नेत्यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तू लावलेला संडास सडून गेला, डबा आणून दे”, मतदानाला निघालेल्या अक्षय कुमारच्या समोर वृद्धाचा हट्ट अन् तक्रार
‘मोठ्या गाड्या, भरपूर पैसा; राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला तरी…’; मतदानानंतर अभिनेता शशांक केतकरची पोस्ट व्हायरल
Ova : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी ‘ओवा’ खा, त्याचे विशेष फायदे समजून घ्या
कोकणात शांततेत मतदान; वृद्ध आणि दिव्यांगानाही बजावला अधिकार
Photo – नॅशनल पार्कमध्ये कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं आवाहन