पुण्यात रिपाइंने वाढवली महायुतीची डोकेदुखी, महायुतीला मतदान न करण्याची कार्यकर्त्यांची शपथ
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱया मतदानाला आता अवघे दोन ते तीन दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे, परंतु पुण्यात रामदास आठवले यांची रिपाइंने महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. मित्रपक्ष म्हणून महायुतीत रिपाइंच्या पदाधिकाऱयांना योग्य सन्मान मिळत नाही, असे सांगत निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱयांनी घेतली आहे. मित्रपक्ष असतानाही ‘रिपाइं’ला सन्मान मिळत नसल्याचा आरोप करून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले होते, मात्र अद्यापही ही नाराजी दूर झालेली नाही. रामदास आठवले यांनी स्वतः पुढाकार घेऊन पदाधिकाऱयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. आठवले यांनी पह्नवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पदाधिकारी मतदान न करण्याच्या निर्धारावर ठाम असल्याने महायुतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
भाजपला आंबेडकरी विचारांची मते चालतात, मात्र त्यांना सत्तेतील वाटा द्यायचा नाही, हे धोरण योग्य नाही. भाजप नेत्यांकडे वारंवार रिपाइंला विधानसभा निवडणुकीत किमान 12 जागा द्याव्यात, अशी मागणी केली जात होती, परंतु भाजपने किंवा महायुतीमधील अन्य पक्षांनाही या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे महायुतीला मतदान करायचे नाही, हा निर्णय घेतला आहे, असे नाराज पदाधिकाऱयांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List