चीन-हिंदुस्थानी सैन्याची लडाखमधील डेमचोक-डेपसांगमधून माघार, दिवाळीला मिठाईची देवाण-घेवाण होणार
हिंदुस्थान आणि चीनमधील महत्वपूर्ण करारानंतर पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांगमधून दोन्ही सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. दिवाळीनिमित्त गुरुवारी दोन्ही सैन्याकडून एकमेकांना मिठाई देण्यात येणार आहे.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही देशांमध्ये गस्त घालणे आणि सैन्य मागे घेण्याबाबत करार झाला आहे. यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदुस्थानी जवानांनी त्यांची लष्करी सामग्री परत आणण्यास सुरुवात केली आहे.
लवकरच या ठिकाणांवर लष्कराची गस्त सुरू होईल. दोन्ही सैन्यांच्या ग्राउंड कमांडर्समध्ये गस्तीची पद्धत अद्याप ठरलेली नाही. चर्चा पूर्ण झाल्यानंतर स्थानिक कमांडर स्तरावर याबाबत चर्चा सुरू केली जाईल.
दोन्ही बाजूंनी राजकीय पातळीवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर चीन आणि हिंदुस्थानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू झाली. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याचे लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच गेल्या आठवड्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List