हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली, कार्तिकी एकादशीचा आज मुख्य सोहळा

हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली, कार्तिकी एकादशीचा आज मुख्य सोहळा

‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ अशा अभंगाची प्रचीती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा सोहळा आज मंगळवारी (12 रोजी) भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संतांच्या दिंड्या दाखल झाल्या असून, पंढरीत चार लाख भाविक दाखल झाले आहेत. यंदा पाऊसमान चांगला झाला असल्याने राज्यभरातून आलेल्या वैष्णवांनी केलेल्या हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली आहे.

पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. 65 एकर भक्तिसागरात 2 लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करीत आहेत. येथील तंबू, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत. यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त

वाढली आहे. त्यामुळे दर्शनरांग चार किमी अंतरावर पोहोचली आहे. आणखी दर्शनरांग पुढे सरकत चालली आहे. मुखदर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत दर्शनरांग सरकली आहे. एकादशीदिवशी येथूनही पुढे चौफळ्यापर्यंत मुखदर्शन रांग जाते. मुखदर्शनासाठीदेखील चार तास लागत आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्तनिवास हाऊसफुल्ल झाली आहेत.

चंद्रभागेत मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी, तसेच 1 हजार 625 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर भाविकांवर आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीकडे येणाऱ्या भाविकांमध्ये विठूमाऊलीच्या नामाचा उत्साह दिसून येत आहे.

प्रासादिक साहित्यांनी बाजारपेठ फुलली

कार्तिकीनिमित्त प्रासादिक साहित्याची दुकानेदेखील फुलली आहेत. पेढे, बुक्का, जपमाळा, देवदेवतांच्या मूर्ती, फोटो फ्रेम आदी खरेदीसाठी भाविक पसंती देत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात प्रासादिक साहित्यांची दुकाने उभारल्याचे दिसून येते. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांकडून प्रासादिक साहित्य, फोटोफ्रेम, मूर्ती, जपमाळा त्याचबरोबर जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यास भाविक प्राधान्य देत आहेत. भाविक व नागरिकांची मागणी लक्षात घेता व्यापारी व दुकानदार यांच्याकडून दखल घेत सेवा पुरवली जात आहे. यामुळेदेखील भाविकांनी बाजारपेठ बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam : मालाडमध्ये राडा, संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप Sanjay Nirupam : मालाडमध्ये राडा, संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
मालाड पूर्वेला पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दिंडोशीतील एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार...
शेजारी हनुमान चालीसा,चेहऱ्यावर मोठी पट्टी; अपघातानंतर कश्मीरा शाहाचा पहिला फोटो समोर
घटस्फोट जाहीर करताना वापरलेल्या हॅशटॅगवरून ए. आर. रेहमान ट्रोल; नेटकरी म्हणाले..
दर्ग्याला भेट दिल्यामुळे राम चरण वादाच्या भोवऱ्यात, बायको म्हणाली, ‘तो स्वतःच्या धर्माचं पालन करतो आणि…’
अशोक सराफ चित्रपटात आपल्या शर्टची दोन बटणं का उघडे ठेवतात? यामागे आहे खूपच रंजक कारण
दूध आणि दही खाण्याचा कंटाळा आला असेल तर, करा या पदार्थांचे सेवन
रात्री लवकर जेवण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या