भाजप सरकारच्या काळात हिंसाचार 70 टक्क्यांनी घटला
भाजपाप्रणीत केंद्र सरकारच्या काळात म्हणजेच गेल्या 10 वर्षांत जम्मू आणि कश्मीरमधील दहशतवाद, ईशान्येकडील हिंसाचार आणि नक्षलग्रस्त परिसरातील हिंसाचार 70 टक्क्यांनी घटला, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. गुजरातच्या गांधीनगर येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठामध्ये अखिल भारतीय राजकीय विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येणाऱ्या दहा वर्षांत हिंदुस्थानची क्रिमिनल जस्टीस प्रणाली जगात प्रचंड वेगवान आणि शास्त्रोक्त करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List