आम्ही 24 तासात अण्विक क्षमता विकसित करू शकतो; रशियाच्या इशाऱ्यानंतर इराणची धक्कादायक आण्विक घोषणा
इराण आणि इस्रयालमधील तणाव वाढला असल्याने जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच आता अण्विक क्षमतेबाबत इराणने धक्कादायक दावा केल्याने जगाची चिंता वाढली आहे.
रशियाने आपल्या अण्विक सिद्धांतामध्ये सुधारणा करण्याचे जाहीर केले. या इशाऱ्यानंतर इराणने केलेल्या दाव्याने जगाची चिंता वाढली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे जवळचे सहकारी मोहम्मद-जावाद लारीजानी यांनी धक्कादायक दावा केला आहे. इराण केवळ एका दिवसात म्हणजे फक्त 24 तासात लष्करी आण्विक क्षमता विकसित करू शकतो, असे त्यांनी जाहीर केले आहे. इराणच्या इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक सायन्सेसचे संचालक असलेल्या लारीजानी यांनी अण्वुक धोरणांबाबत पाश्चिमात्य देशांवरही टीका केली. इराणच्या अण्विक कार्यक्रमावरून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि पाश्चिमात्य देशांसोबतच्या त्यांचा तणाव वाढत आहे. त्यातच इस्रायलसोबतही त्यांचा संघर्ष सुरू आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आल्याने जागतिक अस्थिरतेत आणखी भर पडली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List