तुमचा सत्तेचा उन्माद उतरवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढतोय – शरद पवार

तुमचा सत्तेचा उन्माद उतरवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढतोय – शरद पवार

देशाची सत्ता गेल्या दहा वर्षांपासून मोदी यांच्या हातात आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही काय केले? शरद पवारांनी एवढेच केले, तुमचा सत्तेचा उन्माद उतरवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, असा घणाघात करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी-शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱयावर आहेत. धुळे जिह्यातील शिंदखेडा येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार  म्हणाले, महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. खरे तर त्यांनी दहा वर्षांचा हिशोब दिला पाहिजे.

पेंद्रात गेल्या दहा वर्षांपासून मोदींची सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? आज देशातील शेतकरी चिंतेत आहे. महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. पेंद्रात आमचे सरकार असताना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. देशातील शेतकऱयांचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफीचा प्रस्ताव आणून 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र मोदी ते करत नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सोबत घेत सरकार स्थापन केले. काय केले सरकार स्थापन करून? कोणते निर्णय घेतले? काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱयांची, देशातील तरुणांची आणि भगिनींची?

योजनांपेक्षा महिलांना सुरक्षा द्या

एकीकडे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांत 900 महिलांवर अत्याचार झाले आणि सरकार म्हणते, आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या, असे खडेबोल शरद पवार यांनी मिंधे आणि पेंद्रातील भाजप सरकारला सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कपिल शर्मा नव्या वादात, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला कायदेशीर नोटीस कपिल शर्मा नव्या वादात, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला कायदेशीर नोटीस
कपिल शर्मा याला पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कॉमेडियनचे हे प्रकरण त्याच्या द ग्रेट इंडियन कपिल शर्मा...
मुकेश खन्ना यांनी लग्न का केले नाही? वयाच्या ६६ व्या वर्षीही बॅचलर
टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी बायडन यांची घेतली भेट, सत्ता सोपवण्याबाबत झाली चर्चा
Video : आता गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवार यांचा वळसे-पाटलांना इशारा
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?