शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. मंगळवारी बाजाराची घसरगुंडी झाली होती. बुधवारी बाजार सुरू होताच या घसरणीत आणखी वाढ झाली आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजार कोसळला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बाजाराने थोडी तेजी दाखवली होती. मात्र, आता बाजार कोसळला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने त्याची महत्त्वाची सपोर्ट लेव्हल ब्रेक केल्यानी या घसरणीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.
मंगळवारी शेअर बाजार सुरू झाल्यावर त्यात थेडी तेजी दिसत होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात अनेक मोठ्या शेअरचे दर कोसळल्याने बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. बुधवारी बाजारात आणखी मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार अंकानी कोसळला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 350 अकांपर्य खाली आला होती. इस्रायल इराण संघर्षामुळे जगभरात युद्धाचं सावट आहे. त्यामुळेपरदेशी गुंतवणूकदारांनी जबरदस्त विक्री केल्यामुळे देशातील शेअर बाजारातील घसरण वाढली आहे. बँकिंग, एफएमसीजी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये वेगाने झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे.
बँकनिफ्टीमध्ये 1170 अंकांपर्यत घसरण झाली होती. तर बँक निफ्टी बंद होताना 1069 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजारातील 30 शेअर्सपैकी फक्त 2 शेअर्स तेजीत होते. तर 28 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअरपैकी फक्त 4 शेअर्स तेजीत होते. तर 46 शेअर्समध्ये घसरत दिसून आली. एल अॅण्ड टी, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, रिलायन्स, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभराच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी बुडाले आहेत. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर्सवर दिसून येत आहे. देशातील शेअर बाजारावरही त्याचे परिणाम होत आहे. आगामी काळात शेअर बाजारात घसरण कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List