दिग्दर्शक राम गोपाल वर्माला आंध्र प्रदेश पोलिसांचे समन्स, 19 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना आंध्र प्रदेश पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मॉर्फ केलेली छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात कथित सहभाग असल्याच्या कारणातून वर्मा यांना ही समन्स बजावले आहे. वर्मा यांना 19 नोव्हेंबर रोजी मड्डीपाडू पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रकाशम जिल्ह्यातील पोलीस पथकाने हैदराबादमधील जुबली हिल्स स्थित निवासस्थानी भेट घेऊन वर्मा यांना नोटीस बजावली. वर्मा यांनी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे पोलिसांना सांगितले.
चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्या मॉर्फ केलेल्या प्रतिमा पोस्ट केल्याच्या आरोपावरून प्रकाशम जिल्हा पोलिसांनी 11 नोव्हेंबर रोजी वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मद्दीपाडू येथील रहिवासी रामलिंगम (45) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List