पक्ष फोडणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, तसेच जे गद्दार फुटले त्यांनाही जागा दाखवा; जयंत पाटील यांचे आवाहन

पक्ष फोडणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, तसेच जे गद्दार फुटले त्यांनाही जागा दाखवा; जयंत पाटील यांचे आवाहन

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपांचा फैरीही झडत आहेत. आता जयंत पाटील यांनी पक्ष फोडणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, तसेच पक्ष फोडल्यानंतर जे गद्दार फुटले त्यांनाही त्यांची जागा दाखवायची आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकूर येथे सभेत ते बोलत होते.

पक्ष फोडणाऱ्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे, मात्र पक्ष फोडल्यानंतर जे गद्दार फुटले त्यांनाही त्यांची जागा दाखवायची आहे. या भागात तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी जनतेची, आदरणीय पवार साहेबांची, महाराष्ट्राची फसवणूक केली. सत्ता येते आणि जाते. पण असा फुटीरवादी आणि पक्ष बदलूपणा लोकांच्या लक्षात आला की ते पुन्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही.

महागाई प्रचंड वाढली आहे जीएसटीच्या करांनी व्यापारी, सामान्य नागरिक हैराण झाले आहे. आपल्याकडील तब्बल १७ प्रकल्प बाहेरील राज्यात गेले आहे. आपला सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या या लुटीची लिस्ट खूप मोठी आहे. राज्यात पुरेसे नवीन उद्योग नाहीत. सरकारी नोकरीत कंत्राटी कामगार भरती केले जात आहेत. एमपीएससी ची परीक्षा देणारे आपल्या राज्यातील हुशार तरुण आजही बेकार आहेत. ज्या शोकांतिकेला कारणीभूत फक्त महायुती सरकार आहे.

अहमदपूरच्या एमआयडीसीचा विकास झालेला नाही. नवीन उद्योग इथे आणण्यात स्थानिक नेतृत्व कमी पडलं. आपल्या साखर कारखान्याच्या पलीकडे ते कधी गेले नाहीत. त्यामुळे जनतेच्या मनातील विकास यांना साधता आला नाही. नांदेड – लातूर रेल्वे प्रश्न आजही प्रलंबित आहे. मतदारसंघात 2500 कोटी आणले असे म्हणतात. मग ते गेले कुठे? हा मोठा प्रश्न आहे.

लाडक्या बहिणीला पाडायचे किती प्रयत्न झाले हे महाराष्ट्राने पाहिले. लोकसभेत पराभव दिसल्यानंतर बहिणी लाडक्या झाल्या. लाडकी बहिण नाही तर लाडकी खुर्ची आहे, हे तुम्ही ओळखा. स्व. शिवाजीराव पाटील आणि स्व. विलासराव देशमुख साहेब यांनी कायम या जिल्ह्यात पुरोगामित्व जपलं. ते पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे, असेही जंयत पाटील म्हणाले.

आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा
आमचं घड्याळ चोरीला गेलं आहे, त्यामुळे तुतारीला मतदान करा.आमचे सरकार आणा त्यानंतरच पुण्याचे ट्रॅफिक, खड्डे, पाणी यासारख्या समस्या सुटतील असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कात्रज येथे सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी जबाबदरी उत्तम पार पाडली आहे. प्रशांत जगताप असे कार्यकर्ते आहेत जे एकनिष्ठ राहिले. त्यांनी ठामपणे निर्णय घेत साहेबांसोबत राहिले. लोकसभेला चांगले काम केले. अशा कार्यकर्त्यांमुळे लोकसभेला चांगले यश आम्ही मिळवले. आता विधानसभेत एकनाथ शिंदेंचं सरकार पराभूत करून आमचं सरकार आणा, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. तसेच या परिस्थितीतून ती सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने कित्येकदा सांगितले...
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी बायडन यांची घेतली भेट, सत्ता सोपवण्याबाबत झाली चर्चा
Video : आता गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवार यांचा वळसे-पाटलांना इशारा
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू; आदित्य ठाकरे कडाडले
गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली