पुणे जिल्ह्यात महायुतीत फूट; भाजप, शिंदे गटाच्या विरोधात अजित पवार गटाकडून दौंड, पुरंदरमध्ये एबी फॉर्म

पुणे जिल्ह्यात महायुतीत फूट; भाजप, शिंदे गटाच्या विरोधात अजित पवार गटाकडून दौंड, पुरंदरमध्ये एबी फॉर्म

पुणे जिल्ह्यात दौंड आणि पुरंदरमध्ये महायुतीत अजित पवार गटाकडून भाजप आणि शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात थेट एबी फॉर्म देऊन बंडखोरीचे निशाण फडकवले आहे, तर भोर, जुन्नर, शिरूर, पुरंदरमध्ये महायुतीत बंडखोऱ्या झाल्या आहेत.

दौंडमध्ये महायुतीचे भाजप उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या विरोधामध्ये अजित पवार गटाने वीरधवल जगदाळे यांना एबी फॉर्म देत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर पुरंदरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधात ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक आणि माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना अजित पवार गटाने उमेदवारी देत एबी फॉर्म देऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय भाजपचे गंगाराम जगदाळे आणि माजी जि. प. अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

अजित पवार गटाने जिल्ह्यात दौंड आणि पुरंदर या दोन मतदारसंघांत थेट महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात अधिकृत उमेदवार देऊन महायुतीमध्येच बंडखोरी पेरल्यामुळे जिल्ह्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुन्नरमध्ये महायुतीत अजित पवार गटाचे अतुल बेनके यांच्या विरोधात भाजपच्या आशा बुचके, शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी अर्ज भरले, तर भोरमध्ये शिंदे गटाचे कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, भाजपचे माजी आमदार शरद ढमाले, किरण दगडे यांनी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. शिरूरमध्येदेखील अजित पवार गटाच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि अजित पवार गटाचेच शांताराम कटके यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. खडकवासलातून आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले यांनी अर्ज दाखल केला आहे.

खडकवासला, वडगावशेरीत कुरघोडी

शहरातील वडगावशेरी आणि खडकवासला या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये 13 उमेदवारांचा लपंडाव आणि कुरघोडी सुरू होती. वडगाव शेरीमध्ये जगदीश मुळीक हे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी कुणकुण असल्याने अजित पवार गटाकडून खडकवासला मतदारसंघात माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्जासह दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सज्ज ठेवण्यात आले होते. सतत नेतेमंडळी आणि या दोन्ही मतदारसंघांमध्ये नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांकडून फोनाफोनी सुरू होती. अखेर मुळीक यांनी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे तीन वाजता धनकवडे अर्ज न भरता कार्यालयातून निघून गेले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य...
… संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू – राहुल गांधी
… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल
एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
महाराष्ट्र सरकार शेतकरीविरोधी, भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा! नाना पटोले
Video – चिमुकल्याच्या घोषणांनी उद्धव ठाकरे भारावले; जाहीर सभेत सत्कार
मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला