महिलांना धमकी देणाऱ्या भाजप खासदारांविरोधात कोर्टात जाणार, सुप्रिया सुळे यांचे विधान
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करू अशी धमकी दिली होती. महाडिक यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ असेही सुळे म्हणाल्या.
सुळे म्हणाल्या की, भाजपने महाराष्ट्राला लुटले आहे, महिलांना धमकी देण्याचे पाप भापजने केले आहे. महायुतीने आधी लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर महिलांना धमक्या द्यायला सुरुवात केली. भाजपचे हे घाणेरडे राजकारण आहे. धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार. यापूर्वी निवडणूक आयोगाकडे महाडिक यांच्याविरोधात आधीच तक्रार केलेली आहे. या गुंडगिरीविरोधात आम्ही पूर्णपणे लढू. भाजपकडे कुठलाही अजेंडा राहिलेला नाही, त्यामुळे भाजप घाणेरडे राजकारण करत आहेत. राज्यात भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारीचे आव्हान आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हे प्रश्न आम्ही सोडवू असेही सुळे म्हणाल्या.
#WATCH | Pune, Maharashtra: NCP (SCP) leader Supriya Sule says, “The BJP has nothing to say against us because it has looted the country, looted the state…the BJP has committed the sin of threatening women…We will go to court against the threats being given to women by their… pic.twitter.com/5ZbIOXiVR5
— ANI (@ANI) November 11, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List