Arvind Kejriwal – आयुष्मान भारत योजनेत अनेक मोठे घोटाळे, केजरीवाल यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयुष्मान योजनेच्या आयुष्मान भारत “निरामयम ” या नवीन टप्प्याची सुरूवात केली. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या नव्या योजनेची घोषणा केली. मात्र पंतप्रधानांच्या या घोषणेवरून दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. आयुष्मान योजनेबाबत आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आयुष्मान योजनेत पीएम मोदींचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
आयुष्मान भारत या प्रमुख आरोग्य विमा योजनेंतर्गत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार घेता येणार आहेत. ही सुविधा कोणत्याही उत्पन्न गटातील वृद्धांसाठी उपलब्ध असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मात्र नरेंद्र मोदी यांच्या या योजनेवरून केजरीवाल यांनी आयुष्मान योजनेबाबत केंद्र सरकारला धारेवर धरले. पंतप्रधानांनी लोकांच्या आरोग्याच्या मुद्द्यावर चुकीचे बोलणे योग्य नाही. लोकांच्या आरोग्यावर राजकारण करणे योग्य नाही. आयुष्मान भारत योजनेचा लोकांना फायदा झाला का?” ज्या राज्यांमध्ये आयुष्मान योजना लागू आहे, तेथे आजपर्यंत मला आयुष्मान भारत अंतर्गत उपचार मिळालेली एकही व्यक्ती भेटलेली नाही. त्यामुळे तुम्ही दिल्लीच्या योजनेचा अभ्यास करा, असा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला.
दिल्ली सरकार प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार देते – केजरीवाल
‘आयुष्मान योजनेत घोटाळा झाल्याचे मी नाही तर कॅगच्या अहवालात म्हटले आहे. या योजनेत रुग्ण दाखल झाल्यावरच उपचार केले जातील. मात्र दिल्लीत कोणालाही रुग्णालयात दाखल होण्याची अशी कोणतीही अट नाही. कारण येथे 1 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांच्या ऑपरेशन्सपर्यंत सर्व काही मोफत आहे. त्यामुळे दिल्लीत औषधे, चाचण्या, उपचार, सर्वकाही मोफत असेल तर इथे आयुष्मान योजनेची काही गरज नाही. मोदीजींनी दिल्लीतील योजनेचा अभ्यास करून त्या संपूर्ण देशात लागू कराव्या, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List