राजू शिंदे यांच्या प्रचार रॅलीने बजाजनगर दणाणले!
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ बजाजनगरमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीने बजाजनगर परिसर दणाणून सोडला. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… या घोषणांनी परिसर दणाणला. बजाजनगरातील सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
बजाजनगर येथे शिवसेना उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजाजनगरातील कामगार, शिवसेना पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घराघरातील महिलांनी राजू शिंदे यांचे औक्षण केले. प्रत्येक घरातील ज्येष्ठ नागरिक, महिलांचे आशीर्वाद घेत होते. राजू शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. या प्रचार रॅलीमध्ये भाकासेचे चिटणीस प्रभाकर मते, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, अरविंद धिवर, सचिन गरड, वसंत प्रधान, सतीश हिवाळे, आकाश पवार, विनोद सोनवणे, कोमलसिंग इंगळे, बाळासाहेब कार्ले, सतीश पाटील, विजय सरकटे, कृष्णा राठोड, आसाराम करपे, प्रदीप माळी,सतीश हिवाळे, चंदन संतोष, सतीश कार्पे, गणेश साळे, रोहिदास चव्हाण, निवृत्ती साळे, भगवान देशमुख, सुदाम भांडे, आकाश पवार, काकाजी जिवरग, मारुती साठे, बिबान सय्यद, संभाजी चौधरी, शिवाजी ढेपे, जितेंद्र ढोले, गोकुळ साळुंखे, लक्ष्मण लांडे, विशाल खंडागळे, किशोर खांडरे, रतन नलावडे, नंदू साळुंखे, बजरंग पाटील, नवनाथ मनाळ, नामदेव सागडे, देशमुख, महिला आघाडीच्या लता माळी, अनिता डारिया, संगीता बनकर, ज्योत्स्ना सोनवणे, मनीषा घाडगे, जयश्री भोसले, शोभा सरकटे, कमल गरड, शांताबाई करपे, संगीता मनाळ, लता राऊत, अनिता काळे, अनिता लेंडे, माया पाटील, माया कीर्तीकर, रोहिणी मुळे, विद्या राठोड, शुक्ला, मीरा चव्हाण, मीना राजपूत, शालिनी खरात, कविता अंगज, अर्जुन आदमाने, सिद्राम पारे, बसगोंडा पाटील, दिलीप देशमुख, अशोक पांचाळ, अशोक शिरवाडे, बाळासाहेब उपाहार, संगीता कांबळे, दुर्गा निंबाळकर, विद्या पाटील, विठ्ठल कांबळे, लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत पाटील, भास्कर शेळके, चंदू पाटील, संतोष धुमाळ, बबन शिंदे, धनश्री कांबळे, नूतन आडसरे आदीसह महाविकास आघाडीच्या आजी- माजी विविध आघाड्यांच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List