बॉलिवूडला केले बाय-बाय, या अभिनेत्रीने ज्वॉईन केली गुगलमध्ये नोकरी

बॉलिवूडला केले बाय-बाय, या अभिनेत्रीने ज्वॉईन केली गुगलमध्ये नोकरी

हिंदी चित्रपटसृष्टीतील काम करण्याची संधी मिळणे असं अनेकांचं स्वप्न असतं. पण प्रत्येकालाच यश मिळत नाही. काही यशस्वी होतात काहींना अपयश येते. अनेकांनी अपयश आल्यानंतर इतर क्षेत्रात पाऊल टाकलं. करिअरसाठी अनेकांनी वेगवेगळे मार्ग निवडले. एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी कांगो हिने देखील चित्रपटसृष्टीची प्रसिद्धी सोडून गुगलमध्ये करिअर करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला.

‘पापा कहते हैं’ आणि ‘घर से निकलते ही’ या लोकप्रिय गाण्यांमधून प्रसिद्धी मिळवणारी मयुरी कांगो ही इंडस्ट्रीत चांगलं काम करुन यश मिळवत होती. 2000 मध्ये प्रदर्शित झालेला ‘वामसी’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. तिने नर्गिस, थोडा गम थोडा खुशी, डॉलर बाबू आणि किट्टी पार्टीसह अनेक टेलिव्हिजन शोमध्ये देखील काम केलंय.

2003 मध्ये मात्र तिने वेगळा निर्णय घेतला. मयूरीने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. तिने तेथे बिझनेसमध्ये मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केले. 2004 आणि 2012 दरम्यान तिने नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं. तिने आयआयटी प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण केली होती. आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश देखील मिळवला होता, परंतु त्यावेळी तिने अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी प्राधान्य दिले.

2013 मध्ये ती भारतात परतल्यानंतर मयुरीने परफॉर्मिक्समध्ये व्यवस्थापकीय संचालकाची भूमिका स्वीकारली. काही वर्षांनंतर, ती Google India मध्ये ज्वॉईन झाली. जिथे तिने 2019 मध्ये चांगले यश मिळवले. ती Google India मध्ये तिने काम केले. चित्रपट उद्योगातून ती तंत्रज्ञानाच्या जगात गेली आणि यश मिळवले.

खोया खोया चांद : अचानक कहां गायब हो गई 90s की ये एक्ट्रेस, खूबसूरती में  नहीं थी ऐश्वर्या-दीपिका से कम | Do you know where is papa kehte hain girl mayuri  kango

अभिनेत्री मयुरी कांगोची गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झालीये. मयुरी कांगो ही कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांची मुलगी आहे. मयुरीने ‘पापा कहते है’, ‘होगी प्यार की जीत’ या सिनेमांमध्ये काम केले.

चित्रपट आणि मालिकांमध्ये यश न मिळाल्यानंतर, मयुरीने डिसेंबर 2003 मध्ये औरंगाबादमध्ये एनआरआय आदित्य ढिल्लनशी लग्न केले. मयुरी आणि आदित्य यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एका पार्टीत झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत
कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार असा निर्धार आज कलिन्यातील कानाकोपऱ्यात दिसून आला....
समाज विकास क्रांती पार्टीचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा!
महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…
नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती
महाराष्ट्र पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू; उद्धव ठाकरे कडाडले
बुलेट ट्रेनसाठी बांधकाम सुरू असताना पुल कोसळला; तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले