शिवसेना बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी, त्यांनी ती उद्धव ठाकरेंकडे सुपूर्त केलेली! – संजय राऊत

शिवसेना बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी, त्यांनी ती उद्धव ठाकरेंकडे सुपूर्त केलेली! – संजय राऊत

शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रॉपर्टी असून त्यांनी ती उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्त केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच प्रॉपर्टी आहे. त्यांच्या हयातीमध्ये ती अजित पवारांना देणारे निवडणूक आयोग कोण? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी, शहा कोण? याच मोदी शहांची राज ठाकरे उचलत आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

कल्याणमधील सभेमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी शिंदेंना परस्पर दिली. पोर्तुगिजांनी 16व्या षटकामध्ये जशी मुंबई ब्रिटिशांना आहेर दिली तशी मोदी, शहा या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिंदेना आहेर दिली. राज ठाकरे यांनी यावर बोलायला हवे.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रॉपर्टी असून त्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेना कुणाची हे राज्याच्या, देशाच्या जनतेला माहिती आहेत. पण आज ते ज्यांचा प्रचार करत आहेत त्याच फडणवीस, शहा, मोदी यांनी बाळासाहेबांची, महाराष्ट्राची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे शिंदेंना दिली. त्याच भाजपचा मुख्यमंत्री राज ठाकरे महाराष्ट्रात करायला निघाले असून यासारखे पाप नाही. बाळासाहेब त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही राऊत म्हणाले.

जागावाटप आणि अर्ज मागे घेण्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेना आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये कायम प्रामाणिकपणे कायम करते. आमच्यावर अन्याय झाला असे दिसत असले तरी आम्ही आमचा प्रामाणिकपणा सोडत नाही. आमचे लोक समजदार आहेत. इतरांनीही तो समजदारपणा दाखवावा.

पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्यानं फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवलं! – संजय राऊत

फडणवीसांपासून शिंदेंना सगळ्यात जास्त धोका

देवेंद्र फडणवीस बोलतात एक त्यांच्या मनात दुसरेच असते. फडणवीस जे बोलतात त्याच्याविरुद्ध त्यांच्या पोटात असते. ओठातून बाहेर येणारे शब्द खोटे असतात. त्यांचा गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर तो याच पद्धतीचा आहे. त्यामुळे शिंदेंना सगळ्यात जास्त धोका फडणवीस यांच्यापासून आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या