आई झाल्यानंतर अभिनेत्रीचे वाढले वजन, स्वत:चा यायला लागला राग, म्हणाली, पतीने कधी…
रुपाली गांगुली हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. रुपाली गांगुलीला लोक अनुपमा नावानेच ओळखतात. रुपाली गांगुली सध्या अनुपमा मालिकेत धमाकेदार भूमिका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे रुपाली गांगुलीचा अंदाज लोकांना जबरदस्त आवडताना दिसतोय. रुपाली गांगुली हिचा मोठा चाहतावर्ग देखील आहे. रुपाली गांगुली ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. रुपाली गांगुली अनुपमा मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुपमा मालिकेत मोठे बदल झाल्याचे बघायला मिळतंय. अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये. निर्मात्यांसोबत वाद झाल्याने काही कलाकारांनी मालिका सोडलीये.
अनेक कलाकारांनी अचानक मालिका सोडूनही मालिका टीआरपीमध्ये धमाका करताना दिसत आहे. नुकताच आता रुपाली गांगुली हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रुपाली गांगुली ही दिसलीये. रुपाली गांगुली हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल हे भाष्य केल्याचे बघायला मिळतंय. आता रुपाली गांगुलीच्या विधानाची चर्चा सुरू आहे.
रुपाली गांगुली म्हणाली की, मुलाला जन्म दिल्यानंतर माझे वजन खूप जास्त वाढले होते. तो काळच वेगळा असतो. अगोदर एक महिला त्यावेळी अनेक गोष्टींना सामोरे जात असती त्यामध्ये बरेच लोक वाढलेल्या वजनाबद्दल बोलताना सातत्याने दिसतात. माझ्या ही वाढलेल्या वजनावर अनेकांनी कमेंट केली.
मुळात म्हणजे आई झाल्यानंतर एका महिलेच्या बॉडीमध्ये अनेक मोठे बदल होतात. वेस्ट साईट 24-25 वरून थेट 40 इंच होते. त्यावेळी लोक म्हणतात ओह…तुझे वजन खूपच जास्त वाढले आहे. लोकांचे बोलणे ऐकून खूप जास्त वाईट वाटते. अशावेळी तुम्ही लोकांसमोर स्वत:ला कमी समजण्यास सुरूवात करतात. यावेळी सर्वात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे तुमच्या पतीची.
मला नेहमीच माझ्या पतीने सपोर्ट केलाय. वाढलेल्या वजनावर त्याने कधीच भाष्य केले नाही. मला माझ्या पतीने कधीच म्हटले नाही की, तुझे वजन वाढले आहे, तू चांगली दिसत नाहीये. मला वाटत नाही की, त्याला कधी वाटले की माझे वजन वाढले आहे. पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना रुपाली गांगुली ही दिसली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List