महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुलींसोबत मुलांनाही मोफत शिक्षण, शेतमलाला भाव; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुलींसोबत मुलांनाही मोफत शिक्षण देणार, शेतमालाला भाव देणार असे वचन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात दिले. तसेच महिला सुरक्षेसाठी महिला पोलीस भरती करणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोल्हापुरात उद्धव ठाकरे म्हणाले की, आज राज्यांना मुलींना सरकारी शाळेत शिक्षण मोफत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्यातल्या मुलांनाही आम्ही मोफत शिक्षण देणार. मुलं मुली हे दोन्ही आपले आधारस्तंभ आहेत, भविष्य आहे. महाराष्ट्रात पोलिसांची अनेक पदं रिक्त आहेत. महिला पोलिसांची पदं रिक्त असताना महिलांचं सरंक्षण कोण करणार? महिला पोलिसांची भरती करणार आणि महिला शिपायापासून ते महिला अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचारी महिला असे पोलीस स्थानक सुरू करणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच मुंबईच्या धारावीतला अदानी प्रकल्प रद्द करू आणि धारावीकरांना तिथल्या तिथे घरं आम्ही देणारच. मुंबईत भुमीपत्रांना परवडेल अशा किंमतीत घर देणार. मुंबईत या मुंबई ही मराठी माणसांची आहे, मुंबई मी अदानीच्या घशात घालू देणार नाही. शेतकऱ्यांना हमखास हमीभाव देणार. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर कदाचित तुम्हाला परत कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तुमची साथ असताना मी कुठल्याही आव्हानाला घाबरत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List