भाजपच्या नेत्यांच्या मनातही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर; पूनम महाजन यांनी व्यक्त केल्या ठाकरे कुटुंबाविषयीच्या भावना
लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने पूनम महाजन यांचे तिकीट कापले होते. पूनम महाजन या उत्तर-मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार होत्या. मात्र त्यांच्याऐवजी अॅड. उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे पूनम महाजन नाराजही झाल्या होत्या. आता त्यांनी याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून ठाकरे कुटुंबाविषयीच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
प्रमोद महाजन हे रुग्णालयात होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांना भेटायला आले होते. बाळासाहेबही त्यावेळी आजारी होते. ‘प्रमोद तुम्ही बरे व्हा’, असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते, असे पूनम महाजन यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
मी उद्धव ठाकरे यांना दादा म्हणते. लोकसभेला तिकीट मिळाले नाही त्यावेळी उद्धव ठाकरे यांनाही वाईट वाटले होते. 2024 ला त्यांच्या भाषणातही ते याचा उल्लेख करत होते. तिकीट कापले तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांचाही फोन आला होता. आमचे कौटुंबीक संबंध असून रश्मी वहिनींशी मी सगळे मनातले बोलले, असेही पूनम महाजन यावेळी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List