अंबादास दानवे आणि बबनराव थोरात बुधवारपासून नांदेड दौऱ्यावर
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नांदेड-हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे उद्या दि. 6 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नांदेडचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे उद्या 6 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी किनवट, हदगाव, मुखेड, भोकर, देगलूर, नायगाव, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा विधानसभा, तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकार्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकांना जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक, उपजिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, समन्वयक, उपतालुकाप्रमुख, आजी,माजी जि.प.सदस्य, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, शहरप्रमुख, शहर संघटक, शहर/तालुका समन्वयक, सहसंघटक, सहसमन्वयक, सर्कलप्रमुख, गणप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना व शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List