पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्यानं फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवलं! – संजय राऊत

पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्यानं फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवलं! – संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर राज्य सरकारने वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पदावरून उचलबांगडी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्याने फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवण्यात आले, अशी परखड प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे सरकारच बेकायदेशीर असून त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने अनेक नेमणुका केल्या. ज्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत, ज्या अधिकाऱ्याने विरोधकांचे फोन टॅप केले, ज्या अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होत्या त्यांना सरकार बदलताच गुन्हे काढून थेट पोलीस महासंचालकपदाचे बक्षीस देण्यात आले आणि त्यांच्याकडून अनेक राजकीय गैरकृत्य करून घेतली. अशा व्यक्तीच्या हातात महाराष्ट्रासारख्या राज्याच्या निवडणुकाची सूत्र असू नयेत हे आम्ही वारंवार सांगत होतो. अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताईला हटवण्यात आले.

महाराष्ट्रासारख्या राज्याचे पोलीस महासंचालकपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि त्या पदावर कुणाला बसवावे याचे जर भान गृहमंत्र्यांना नसेल तर त्यांना प्रशासन, राज्यव्यवस्था आणि नैतिकता कळत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत, उशीरा का होईना त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला. फक्त आम्हाला चिंता एवढीच आहे की ‘पंत गेले आणि राव आले’ असे होऊ नये. त्यामुळे आता जपून पावले टाकावी आणि निवडणूक काळात संघाचा, भाजपचा अजेंडा राबवू नये याची काळजी घ्यावी, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपण तटस्थ आहोत वगैरे दाखवण्यासाठी काही गोष्टी निवडणूक आयोगाला कराव्याच लागतात. विरोधी पक्षाने तक्रार केल्यावर झारखंडच्या पोलीस महासंचालकांची बदली होते. कारण तिथे भाजप सत्तेवर नाही, तर हेमंत सोरेन, काँग्रेसची सत्ता आहे. तिथे भाजप विरोधी पक्षात असून तिकडे तक्रार केल्यावर 24 तासात पोलीस महासंचालक बदलला जातो. इथे आम्ही गेले 4 महिने तक्रार करत आहोत. त्यांच्यावर कारवाई होत नाही.

रश्मी शुक्ला यांची बदली केली असली तरी निवडणुका निपक्षपणे होतील याची अजून खात्री नाही. आजही सत्ताधाऱ्यांच्या अधिकृत सरकारी गाड्यातून पैशाचे वाटप सुरू आहे आणि विरोधकांच्या गाड्यांवरती, घरांवरती धाडी टाकल्या जात आहेत. रस्त्यावर सामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे. महिसांच्या पर्स उघडून तपासल्या जात आहेत. निवडणूक आयोगाचे निरीक्षक मूग गिळून गप्प बसलेले आहेत. पोलीस यंत्रणा ठप्प आहे, असेही राऊत म्हणाले.

कोण होणार राज्याचे नवीन पोलीस महासंचालक? विवेक फणसाळकर यांच्यासह दोन अधिकारी स्पर्धेत

यावेळी राऊत यांनी ईव्हीएमचा मुद्दाही उपस्थित केला. अमेरिकेसारख्या महासत्तेची आज निवडणूक होत असून तिथली जनता बॅलेट पेपरवर मतदान करत आहे. ज्यांची माणसे चंद्रावर उतरलेली आहेत, विज्ञान, संशोधन, आधुनिकतेत जे पुढे आहेत तिथे राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक बॅलेट पेपरवर होत आहे. तिथली जनता मतपत्रिकेवर आपला अध्यक्ष निवडते हे आमच्या निवडणूक आयोगाला कळत नसेल तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि विचारसरणीवर प्रश्नचिन्ह कायम निर्माण होईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत
कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार असा निर्धार आज कलिन्यातील कानाकोपऱ्यात दिसून आला....
समाज विकास क्रांती पार्टीचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा!
महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…
नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती
महाराष्ट्र पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू; उद्धव ठाकरे कडाडले
बुलेट ट्रेनसाठी बांधकाम सुरू असताना पुल कोसळला; तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले