“मी व्हिडीओ टाकला आणि…”, शशांकच्या तक्रारीची BMCकडून दखल; सर्व परिसर एकदम चकाचक

“मी व्हिडीओ टाकला आणि…”,  शशांकच्या तक्रारीची BMCकडून दखल; सर्व परिसर एकदम चकाचक

Shashank Ketkar On Garbage: अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर भाष्य करत असतो, मुख्यत: स्वच्छचेबाबात तर त्याचा कायम पुढाकार पाहायाला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने फिल्मीसिटी बाहेरील अस्वच्छतेबाबत एक व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली होती. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने यावर भाष्य केले होते. त्यानंतर महापालिकेने तात्काळ कारवाई करत फिल्मीसिटी बाहेरील कचरा उचलला होता. त्यानंतर शशांकने रविवारी मालाडच्या मालवणीमधील अस्वच्छतेबाबत व्हिडीओ करत त्यावर नाराजी व्यक्त केली होती. शशांकने रविवार (२० ऑक्टोबर) रोजी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मालाड पश्चिम, मालवणीमधील कचऱ्याची तक्रार केली होती.

व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला होता संताप

शशांकने त्या ठिकाणचा व्हिडीओ शेअर करत “काय करायचं? असा सवाल विचारत प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्या ठिकाणची सर्व परिस्थिती सांगत त्याने सरकार आणि स्थानिक यंत्रणेला थेट सवालही उपस्थित केला होता. “मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत असून अशा परिस्थितीबद्दल भाष्य करत आहे. माझ्यातील आशा अजूनही जीवंत आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या नजरेस आणून देत आहे आणि मी हा कचरा साफ होईपर्यंत माझ्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो पोस्ट करेन”

पुढे त्याने म्हटलं होतं “यानंतर माझ्याच इंडस्ट्रीतली लोक आणि काही प्रेक्षक मला टोमणे मारतील. किंवा नाव ठेवतील. तुला काय करायचं आहे, कचरा असूदेत, खड्डे असूदेत, माणसं मरुदेत. तुला काय करायचं आहे असं म्हणतील. पण आपल्याला पोलिस, देव आणि सरकारच्या भीतीमधून बाहेर पडलं पाहिजे. अनेकजण मला पाठींबाही देतील पण भीतीपोटी कुणीही खुलेआम याबद्दल बोलणार नाही. पण मला हे करायचं आहे, कारण ही माझी जबाबदारी आहे”. असं म्हणतं त्याने ही हाती घेतलेली मोहीम कायम सुरु ठेवणार असल्याचं सांगितले होते. अखेर त्याच्या या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश आलेलं आहे. महानगरपालिकेने याची दखल घेतली आहे.

महानगरपालिकेने घेतली दखल

शशांकच्या या कचऱ्याच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने याकडे लक्ष देत योग्य ती कार्यवाही केली आहे. शशांकने आधी शेअर केलेल्या कचरापेटीबाहेर आता कचरा साफ झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने त्याने महानगरपालिकेचे आभार मानले आहेत. दरम्यान शशांकने त्या स्वच्छ जागेचा व्हिडीओ शेअर करत समाधान व्यक्त केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

तसेच त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे “मला महानगरपालिकेचे आभार मानायचे आहेत आणि त्यांचे अभिनंदन करायचं आहे. मी व्हिडीओ टाकल्यानंतर लगेच कार्यवाही केली. आत इथे अजिबात कचरा दिसत नाहीये. या गोमाता रोजच्या सवयीप्रमाणे इथे येऊन बसल्या आहेत. कदाचित लोकांनी कचरा टाकला नसेल किंवा महानगरपालिकेच्या बांधवांनी तो कचरा लगेचच उचलला असेल. त्यामुळे आता रस्त्यावर कचरा नाही. परिसर स्वच्छ दिसत असून हे खूप कौतुकास्पद आहे”.

नेटकऱ्यांकडून शशांकचे कौतुक

पुढे त्याने लिहिले आहे “हीच स्वच्छता कायम राहावी ही आपल्या नागरिकांना आणि महानगरपालिकेला माझी विनंती आहे”. असं आवाहनही त्याने केलं आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेकांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे. “खूप छान शशांक, उत्तम कामगिरी असेच चुकीच्या गोष्टीना वाचा फोडत रहा. आमचा कायम तुला पाठींबा राहील”, “तुझ्या व्हिडीओमुळे किती फरक पडतो”, “चुकीची जाणीव करुन दिल्याशिवाय प्रशासन आणि जनतेला जाग येत नाही”, “खरंच शशांक तू काय ग्रेट आहेस” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शशांकचे कौतुक केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राधानगरी...
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार
‘सामना’चे जीमेल, यूटय़ुब चॅनेल हॅक, गैरवापर रोखण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार
कुठेतरी थांबले पाहिजे! शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
ठसा – श्याम मोकाशी
सामना अग्रलेख – हिंदू खतरे में! योगींना कॅनडात पाठवा
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? अटीतटीच्या लढाईसाठी मतदान सुरू; विजयाची समान संधी असल्याचा अंदाज