माथेरानच्या राणीला अखेर मुहूर्त मिळाला; 6 नोव्हेंबरपासून सेवा सुरू होणार

माथेरानच्या राणीला अखेर मुहूर्त मिळाला; 6 नोव्हेंबरपासून सेवा सुरू होणार

माथेरानची राणी म्हणजेच नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आधी 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. मात्र, काही काम शिल्लक असल्याने 1 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, हा मुहूर्तही हुकल्याने पर्यटकांची आवडती माथेरानची राणी कधी सुरू होणार असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. मात्र, आता 6 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता माथेरानच्या राणीला मुहूर्त सापडल्याने पर्यटकांची पावले माथेरानकडे वळणार आहेत.

6 नोव्हेंबरपासून नेरळ – माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचे व्ळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा (नेरळ – माथेरान डाऊन ट्रेन्स)

52103 नेरळ प्रस्थान 8.50 वा. आणि माथेरान आगमन 11.30 वा. (दररोज)

52105 नेरळ प्रस्थान 10.25 वा. आणि माथेरान आगमन 13.05 वा. (दररोज)

माथेरान – नेरळ अप ट्रेन्स

52104 माथेरान प्रस्थान 14.45 वा. आणि नेरळ आगमन 17.30 वा. (दररोज)

52106 माथेरान प्रस्थान 16.00 वा. आणि नेरळ आगमन 18.40 वा. (दररोज)

ट्रेन नं. 52103/52104 आणि 52105/52106 एकूण 6 डब्यांसह चालविण्यात येतील. ज्यामध्ये 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन अशी संरचना असेल.

अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (माथेरान – अमन लॉज शटल सेवा, दैनिक)

52154 माथेरान प्रस्थान 8.20 वा. आणि अमन लॉज आगमन 8.38 वा.

52156 माथेरान प्रस्थान 9.10 वा. आणि अमन लॉज आगमन 9.28 वा.

52158 माथेरान प्रस्थान 11.35 वा. आणि अमन लॉज आगमन 11.53 वा.

52160 माथेरान प्रस्थान 14.00 वा. आणि अमन लॉज आगमन 14.18 वा.

52162 माथेरान प्रस्थान 15.15 वा. आणि अमन लॉज आगमन 15.33 वा.

52164 माथेरान प्रस्थान 17.20 वा. आणि अमन लॉज आगमन 17.38 वा.

शनिवार/रविवारी अतिरिक्त विशेष सेवा खालीलप्रमाणे

विशेष- माथेरान प्रस्थान 10.05 वा. आणि अमन लॉज आगमन 10.23 वा.

विशेष-माथेरान प्रस्थान 13.10 वा. आणि अमन लॉज आगमन 13.28 वा.

अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दैनिक)

52153 अमन लॉज प्रस्थान 8.45 वा. आणि माथेरान आगमन 9.03 वा.

52155 अमन लॉज प्रस्थान 09.35 वा. आणि माथेरान आगमन 09.53 वा.

52157 अमन लॉज प्रस्थान 12.00 वा. आणि माथेरान आगमन 12.18 वा.

52159 अमन लॉज प्रस्थान 14.25वा. आणि माथेरान आगमन 14.43 वा.

52161 अमन लॉज प्रस्थान 15.40 वा. आणि माथेरान आगमन 15.58 वा.

52163 अमन लॉज प्रस्थान 17.45 वा. आणि माथेरान आगमन 18.03 वा.

शनिवार/रविवारी अतिरिक्त विशेष सेवा

विशेष-अमन लॉज प्रस्थान 10.30 वा. आणि माथेरान आगमन 10.48 वा.

विशेष-अमन लॉज प्रस्थान 13.35 वा. आणि माथेरान आगमन 13.53 वा.

सर्व शटल सेवा 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांसह चालविण्यात येतील.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या