अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीने रवी शास्त्रींना देखील केलंय डेट, सत्य जाणून व्हाल थक्क
Nimrat Kaur – Abhishek Bachchan: चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेता अभिषेक बच्चन – अभिनेत्री निम्रत कौर यांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. निम्रत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर कमेंटमध्ये अनेकांनी अभिनेत्रीचं नाव अभिषेक बच्चन याच्यासोबत जोडलं. पण यावर अभिषेक – निम्रत यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सांगायचं झालं तर, निम्रत हिचं नाव याआधी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं.
एक काळ असा होता जेव्हा, निम्रत कौर आणि रवी शस्त्री यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. अशात रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं निम्रत हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितंल होतं. एवढंच नाही तर, रवी शास्त्री यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं होतं.
एका मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले होते, ‘अशा बातम्यांमध्ये गायीच्या शेणाशिवाय काहीही नसतं. सर्व वायफळ चर्चा आहे. माझ्यात आणि निम्रतमध्ये असं काहीही नाही…’ असं म्हणत शास्त्री यांनी देखील रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण रिपोर्टनुसार, रवी शास्त्री आणि निम्रत यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केलं.
रवी शास्त्री आणि निम्रत कौर यांची पहिली ओळख
2015 मध्ये एका लग्झरी कारच्या लॉन्चिंग दरम्यान रवी शास्त्री आणि निम्रत कौर यांची पहिली ओळख झाली होती. कारचं एकत्र प्रमोशन करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. शिवाय दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.
रवी शास्त्री यांचा घटस्फोट
सांगायचं झालं तर, रवी शास्त्री यांचा घटस्फोट झाला आहे. रवी शास्त्री यांचं लग्न 1990 मध्ये रितू सिंग यांच्यासोबत झालं होतं. पण लग्नाच्या 22 वर्षांनंतर म्हणजे 2012 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रवी शास्त्री आणि रितू सिंग यांना एक मुलगी देखील आहे. तर निम्रत कौर वयाच्या 42 व्या वर्षी देखील अविवाहित आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List