वार्तापत्र – चांदिवलीत हात बदलेगा हालात!

वार्तापत्र – चांदिवलीत हात बदलेगा हालात!

>> बबन लिहिणार

168 चांदिवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार मो. आरिफ (नसीम) खान हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर शिंदे गटाकडून दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांच्या मनसेनेही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे, परंतु मनसेने मराठी उमेदवाराला डावलून थेट अमराठी असलेल्या महेंद्र भानुशाली यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे चांदिवलीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. चांदिवली मतदारसंघात 2014 मध्ये नसीम खान हे 73 हजार 141 मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी संतोष सिंह यांचा 29 हजार 469 मतांनी पराभव केला होता, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नसीम खान यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी त्यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव केला होता, परंतु त्या वेळी शिवसेना अखंड होती. त्यामुळे दिलीप लांडे यांचा विजय झाला होता, परंतु आता परिस्थिती उलट आहे. नसीम खान यांना महाविकास आघाडीचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे नसीम खान यांच्या विजयाचे पारडे जड मानले जात आहे. चांदिवलीत गेल्या पाच वर्षांत विकासाच्या नावाने नुसती बोंब मारली गेली आहे. खरं म्हणजे लांडे यांना या मतदारसंघात विकास करण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यांना कोणत्याही मोठय़ा योजना मतदारसंघात आणता आल्या नाहीत. चांदिवलीत वाहतुकीची समस्या, पाणीटंचाईची समस्या, नागरी सुविधेचा अभाव, रखडलेले एसआरए प्रकल्प, अवैध जागेवर कब्जा, रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले यांसारख्या समस्या सोडवण्यात लांडे यांना अपयश आले आहे.

 

नसीम खान विरुद्ध दिलीप लांडे यांच्यात थेट लढत

मतदारसंघात समस्याच समस्या

चांदिवली मतदारसंघात भरमसाट समस्या आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे शेकडो नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पार्ंकगची समस्या वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली आहे. या प्रमुख समस्यांकडे आमदार म्हणून दिलीप लांडे यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

 

गद्दारीचा शिक्का

दिलीप लांडे यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाणार आहे. लांडे यांनी गद्दारी करत ते शिवसेना सोडून मनसेत गेले. मनसेतून पुन्हा शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळी गद्दारी केली, त्या वेळी दिलीप लांडे यांनी पुन्हा एकदा गद्दारी करीत शिंदेंसोबत गुवाहाटीला पोहोचले. त्यामुळे दिलीप लांडे यांच्यावर मतदारसंघातील मतदार नाराज आहेत. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या