शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले महायुती सरकार हटवा; कैलास पाटील यांचे जनतेला आवाहन

शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले महायुती सरकार हटवा; कैलास पाटील यांचे जनतेला आवाहन

महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले महायुती सरकार हटवा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांनी केले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात वाठवडा (ता. कळंब) येथे झालेल्या कॉर्नर सभेत त्यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.

कैलास पाटील म्हणाले की, पहिल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. मात्र, त्यातील दोन वर्षे कोविडच्या संकटात गेली. त्यामुळे आम्हाला फक्त सहा महिनेच काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्या कालावधीत देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर सत्तेवर आलेले महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेवून केवळ राजकीय फायद्यासाठी धोरणे आखली आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत ते म्हणाले की, महायुती सरकारने दिलेली आश्वासने फोल ठरली आहे. शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येत अडकवले आहे, हमीभावाच्या नावाखाली शेतमालाची विक्री ठप्प झाली आहे आणि पिकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सरकार शेतकऱ्यांना आधार देण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत होती, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलली होती. कोविड काळात देखील आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक दिली आहे. यामुळे आज शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेची संधी दिल्यास, आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करू. पिकविमा योजना पुन्हा सक्षमपणे राबवू, शेतमालाला चांगला दर मिळवून देऊ, आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढू. वाठवडा गावातील समस्यांवर विशेष लक्ष देत शेतकऱ्यांना हक्काचे जीवनमान उभे करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

कैलास पाटील यांच्या या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित त्यांच्या या भाषणाने मतदारसंघात चर्चेला नवीन दिशा दिली आहे. यावेळी रामलिंग आव्हाड, अण्णासाहेब तनमोर, बिभीषण देशमुख, भारत इरपतगिरे, हनुमंत साळुंखे, बालाजी आल्टे, नारायण गवळी, काका राऊत, विजय इंगळे, वकील पठाण, अमृत टेकाळे, आकाश पवार, सल्लाउद्दीन बेग , फकीर सय्यद, संदेश पवार, बाप्पा येवनकर, खंडू आल्टे, अमित आल्टे, राजाभाऊ आल्टे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या