Mumbai News – अन्नमित्रने शेकडो गरीबांची दिवाळी केली गोड

Mumbai News – अन्नमित्रने शेकडो गरीबांची दिवाळी केली गोड

नेहमीच गरीब गरजू आणि भुकेल्यांना आपुलकीचे आणि प्रेमाचे दोन घास देणार्‍या सौरभ मित्र मंडळाच्या ‘अन्नमित्र’ सत्कार्याने टाटा रुग्णालय परिसरात 300 गरीब, गरजूंसह कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली.

सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमाच्या माध्यमातून गेली चार वर्षे केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरात गरीब, गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान केले जात आहे. मात्र यंदाही दिवाळीनिमित्त अन्नमित्रचे सर्वेसर्वा संजय सोमनाथ शेटये यांनी पुढाकार घेत 300 गरीबांची दिवाळी गोड करण्याचे कार्य केले. या सत्कार्यासाठी राजेश सोनावडेकर, भारतेंदु तिवारी, दिलीप कदम, संभाजी कदम, संदीप शुक्ला, सुलभा गोरिवले, अनन्या गुरव, नुरूर खानोलकर, सुजाता परब, दर्शना पाटील यासारख्या अनेक दात्यांनी सढळ हस्ते फराळाचे साहित्य देऊन सहकार्य केले. सौरभच्या या सत्कार्याला माजी महापौर महादेव देवळे, रणजीपटू सिद्धेश लाड, मुंबई पोलीस दलातील अशोक शिरसाट, वसंत खामकर, अनिल बोंग यांनीही प्रत्यक्ष उपस्थिती दाखवत गरीबांना फराळाचे वाटप केले. या दिवाळी फराळासोबत किरण शेट्टी आणि सुनीता कोटियन यांनी 125 महिलांना साड्याही वितरित केल्या.

चिमकुल्यांनी पिगी बँकेतले पैसे दिले फराळाला

अन्नमित्रच्या सत्कार्याला ज्येष्ठ श्रेष्ठांसह चिमुकल्यांनीही मदतीचा हात देत नवा पायंडा पाडला. नम्रता पाटोळे आणि शलाका पाटोळे यांच्या घरातील चिमुकल्या शैवी पाटोळे आणि श्रीशा पाटोळे यांनी आपल्या आई-बाबांकडून केले जाणारे सत्कार्य पाहून अन्नमित्रच्या फराळासाठी आपल्या पिगी बँकेत जमा झालेले सर्व खाऊचे पैसे दिले. चिमुकल्यांचे हे दान पाहून उपस्थित पाहुण्यांनी दोघींचे कौतुक केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या