मराठीचा आग्रह धरणार नाही, उद्दाम टीसीने प्रवाशाकडून लिहून घेतला माफीनामा
मी मराठी आणि मुस्लीम व्यक्तींसोबत व्यवसाय करत नाही असे विधान एका टीसीने केले होते. ही घटना ताजी असताना एका टीसीने मराठी प्रवाशाकडून मराठी बोलणार नाही असा माफीनामा लिहून घेतला आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले असून सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमित पाटील हे नालासोपारा स्टेशनवर उतरले. तेव्हा तिथे रितेश मौर्या हे प्रवाशाचे तिकीट तपासत होते. मौर्या यांनी अमित पाटील यांना तिकीट विचारले. पाटील यांनी आपल्याला हिंदी येत नाही आपल्याशी मराठी बोलावे अशी विनंती केली. तेव्हा मौर्य यांनी पाटील यांच्याशी हुज्जत घातली मराठीत बोलणार नाही असे उद्दामपणे म्हणाले. इतक्यावरच न थांबता मौर्य यांमनी रेल्वे पोलिसांना बोलावलं आणि पाटील यांना धमकावून लेखी माफी मागयला लावली. तसेच मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असे लिहायला सांगितले. या माफीनाम्याचा एक फोटो व्हारल झाला आहे, त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List